नारायणगव्हाणमध्ये बिनविरोध निवडणुक करुन तालुक्यात नवा आदर्श उभा करणार- सचिन शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

नारायणगव्हाणमध्ये बिनविरोध निवडणुक करुन तालुक्यात नवा आदर्श उभा करणार- सचिन शेळके

 नारायणगव्हाणमध्ये बिनविरोध निवडणुक करुन तालुक्यात नवा आदर्श उभा करणार- सचिन शेळकेनगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण गावाला आदर्श गाव करण्यासाठी गावात लोकसहभाग व श्रमदानातुन गावकर्‍यांनी मोठी मेहनत घेतली असुन गावात मोठे महापरिवर्तन झाले आहे. गावाचे नाव मोठ्या उंचीवर आले असुन गावाच्या विकासाबरोबर गावाच्या एकात्मतेसाठी संदनशिल परिस्थित वेळोवळी अनेक उपक्रम घेवुन गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठा संघर्ष कण्यात आलेला आहे. अगदी लहान मुलांपासुन ते जेष्ठांपर्यंत सर्वजन सलोख्याने राहत असुन गावकरी गावात एकोप्याने परिवाराप्रमाणे सुखाने राहत आहेत. परंतु निवडणुकीच्या काळात गावाला ग्रहण लागलेले दिसत असुन गावच्या एकात्मतेला तडा जावु नये यासाठी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणुक करण्यासाठी गावात जनजागृती करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

      चारित्र्यशिल उमेदवारांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यास नोकरीचा राजीनामा देवुन "आम्ही नारायणगव्हाणकर" नावाचा सामाजिक कार्यर्त्यांचा पॅनल उभारुन गावाला नवा पर्याय उभा करुन गावाला आदर्श गाव करण्यासाठी पुर्ण वेळ देवुन पॅनल निवडुन आणणार व गावाला भ्रष्टाचारमुक्त गाव करण्यासाठी निस्वार्थ सेवा अंतिम श्वासापर्यंत करण्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

चौकट ओळ- गावाला गावपण देण्यासाठी गावाला योगदान देणार्‍या चारित्र्यशिल  उमेदवारांना डावलल्यास नारायणगव्हाणकरांच आदर्श गावच स्वप्न पुर्ण करण्यासाठी नोकरीचा राजीनामा देवुन गावाच्या हितासाठी "आम्ही नारायणगव्हाणकर"नावाचा सामाजिक कार्यकर्त्यांचा नवा पॅनल उभा करुन ही लढाई जिंकणार आहोत.- सचिन शेळके(सामाजिक कार्यकर्ते)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here