आचार संहितेचा भंग केल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर कार्य वाहीचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

आचार संहितेचा भंग केल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर कार्य वाहीचा इशारा

 आचार संहितेचा भंग केल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा कठोरचा इशारा



नगरी दवंडी

अहमदनगर :- जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आयोगाच्या घोषणेसोबत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता जारी झाली आहे.निवडणूक प्रक्रिये दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील तब्बल ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचावर्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत.दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगामार्फत होत असते.

एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकी संदर्भातील प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतींच्या २ हजार ६५० प्रभागातून एकूण ७ हजार २३४ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment