राजकारण आणि आजचा ग्रामीण युवक…. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

राजकारण आणि आजचा ग्रामीण युवक….

 राजकारण आणि आजचा ग्रामीण युवक….


राजकारण म्हटले की अजकालचा तो भाऊ, दादा, आणि पुष्कळशा मोठ मोठ्या उपाध्या. त्याच्याही पुढे जाऊन मात्र या युवकांनी आपले भविष्यातील राजकारण विषयांची स्वप्ने देखील काबीज केली आहेत. “नाव मोठ नी लक्षण खोट” असे महापराक्रमी निष्फळ कामाचे जनक असलेले आजच्या या २१ व्या शतकातील तरुण आता म्हटलं की, निश्चितच गल्लीतल्या सार्वजनिक गणपती उत्सवापासून सुरु झालेला प्रवास, तरुण म्हटलं की सळसळत रक्त, अंगात जोश आणि ताकद. “लाथ मारील तिथे पाणी काढील” असेही बराच काही व्यक्तिमत्व बघायला मिळतात परंतु गव्हाबरोबर किडेही रगडले जातात तसाच काहीसा प्रकार आज आपणा सर्वांना सर्रास पाहावयास मिळतोय.
खरंच आजच्या या विषयाच्या माध्यमातून जनसामान्यातील सर्व तरूण वर्गाला विचार करायला भाग पडणारा प्रश्न उपस्तीत झालाय जे आपले पाऊल भविष्यात राजकारणाकडे वळवताना दिसताहेत. पूर्वीच्या काळाच्या राजकारणात आपली सत्ता कायम टिकवायला जी प्रतिष्ठा पणाला लागायची आज ती आपल्याला हळूहळू कोलमडताना दिसतेय. निश्चितच तिचा ऱ्हास होत चाललाय. पूर्वकाळाच्या राजकारणात जी ताकत नेते मंडळींमध्ये होती ती आज लोप पावताना दिसतेय. निवडणुकांवर उधळला जाणारा पैसे आज सर्वात मोठा प्रश्न आहे. आपल्या पक्षाचा आदर, त्याच्या बद्दलचे प्रेम, आत्मीयता या सर्व गोष्टी त्या काळात खूप मोठ्या समजल्या जायच्या परंतु आता मात्र ते दिवस उरले नाहीत. आजच्या काळातील तरुण त्याचा स्वतःचा आत्मविकास, सामाजिकविकास, मूलभूत गरजा ,सोयी सुविधा वगळून स्वतः बरोबर स्पर्धा करायची सोडून तो जगातील इतर लोकांशी स्पर्धा करतोय परंतु ती त्यांच्या चैनीच्या वस्तूंशी!
अगदी पहाटेच्या साखर झोपेत स्वप्न बघावं आणि कुणीही उठुन राजकारणात यावं असाच काहीसा प्रकार आज आपल्या समोर घडतोय. “उतवळा नवरा नी गुडघ्याला बाशिंग” असे हे आजच्या राजकारणातील उदयोन्मुख चेहरे आपल्याला बघायला मिळताहेत. या २१ व्या शतकातील तरुणांना काही लोकांनी आपला प्रतिनिधी म्हणून कुठेतरी स्थान द्यावे आणि याने लगेच दूसऱ्या दिवशी पासून पांढऱ्या शुभ्र खादीचा शर्ट आणि पायजमा घालावे असे आमचे भावी नवतरुण राजकारणी. ते म्हणतात ना “आहेत तरुण तर घ्या करून” असे आमचे भावी चेहरे भारताची व्यवस्था सांभाळणार आहेत. असा साधा एका क्षणासाठी विचारही केला तर आपल्याला धाक पडतोय.
आजचा तरुण जनहिताची कामे कमी आणि स्वतःची वाहवा करण्यात व्यस्त आहेत. आपल्याच घरातील जर कुणी राजकारणात चांगल्या प्रतिष्ठित ठिकाणी असेल तर मग मात्र सोन्याहून पिवळं. या राजकारणातील तरुण राजकारण्यांच्या घरात जन्माला आला म्हणजे त्याचे भाग्यचं. निश्चितच त्याने पूर्वजन्मात चांगले काहीतरी केले असावे व आता या समाजाच्या सुधारणेत आपला वेगळा असा कामचुकार पणाचा ठसा उमठावायलाच आला असावा. आपल्या वाढ-वडिलांच्या राजकारणांच्या प्रतिष्टेवरचं हे आपले भविष्यातील पोट भरण्याचे स्वप्न पाहत आहेत. २१ व्या शतकातील तरुणांनी राजकारणात आपली वेगळी अशी ओळख तयार करण्याचे कष्ट केव्हाच सोडून दिले आहेत. तो फक्त मोठं-मोठे व्यक्तींसोबत छायाचित्र काढणे, सभा,भाषणे आणि छोट्यामोठ्या कार्यक्रमात आमची हजेरी लावण्यात व्यस्त झालाय.
व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा आजच्या काळातील राजकारणी तरुण घेतोय असे म्हणायला काहीच हरकत नाही. त्याच्या आयुष्यातील शिक्षणाचे महत्त्व , मान-मर्यादा, सन्मान, त्याची नीतिमत्ता, मुल्ले तो कधिकाळीच विसरून गेलाय. तो त्याच्या या दयनिय अवस्थेत कुठल्या कुठल्या मार्गाचा अवलंब करतोय हे त्यालाही काळात नाहीये. तो फक्त आपला मोठेपणा, मीपणा, आपला अहंकार हेच आपले सर्वस्व मानतोय परंतु हे त्याला कधी उमजणार कुणास ठाऊक? एक माणूस म्हणून विचार करायला देखील त्याच्याकडे वेळ उरला नाहीये. तो काय करतोय? काय करायला हवे आणि नाही असा विचार करायला भाग पडणारी,थोडीशीही माणुसकी त्याच्या मध्ये शिल्लक राहिली नाहीये. थोर मंडळींच्या राजकारणातील सल्ला म्हणजे यांना यांचा अपमान किंवा कमीपणा वाटतो. सद्यस्थितीतील तरुण या राजकारणाच्या भांड्यात एवढा गुरफडून गेलाय कि त्याला कुठल्या झेंड्याचा आधार घ्यावा हेच कळत नाहीये. आपल्या आत्मविकासाबरोबर समाजकारण,समाजाच्या हिताच्या गोष्टी ,शिक्षण,आरोग्य,नोकरी,व्यवसाय या सगळया प्रश्नांवर अभ्यास करून त्या कशा प्रकारे सोडवाव्यात हे सगळे सोडून तो आपल्याला स्वतःच्या भल्यासाठी जनतेचा कशा प्रकारे वापर करून घेता येईल, त्यांना त्याच्या एकीचे महत्व न सांगता आंदोलने, हिंसाचार, दंगली या सगळ्यांमध्ये गुरफडून टाकतोय. एकीकडे धर्म-पंथ,जात एक असल्याचा बोभाटा करणारा तरुण राजकारणाच्या नवाखााली माणुसकीच विसरून गेलाय. समाजाला जेवढे अंधारात ठेवता येईल तेवढे तो प्रयत्न करतोय व समाजाला हिंसाचारासाठी प्रवृत्त करतोय. आजच्या राजकारणातील तरुणांना राजकारणाला एका बाजार पेठेचे स्वरूप प्राप्त करून दिलेय आणि याच बाजारपेठेत मोठं-मोठें उद्योगधंदे देखील त्यांनी उभारले आहेत. सामान्य जनतेलाच त्यांची मते विकत घेऊन सत्तेवर येणारा तरुण या पिढीला असा कुठला चांगला मार्ग दाखवणार आहे किंवा कुठली समाजाहिताची कामे करणार आहे हेच मोठा पक्ष प्रश्न आहे.
राजकारणात आपले भविष्य पाहणारा तरुण आत्ताच काही उणाडक्या करणाऱ्या तरुणांचा आधार घेऊन जर ‘भावी आमदार’ ची स्वप्न पाहत असेल तर काय होईल राजकारणाचे. शेवटी मग पुढारपणा करण्यातच मग त्यांचे सगळे आयुष्य निघून जायचे आणि पक्षांतर करून आपले स्वतःचे पोट कसेतरी भरवायचे एवढेच दिसून येते. शेवटी म्हणतात ना; “घरोघरी मातीच्याच चुली” तसेच हे सगळे राजकारणी…..!

 *संजय भापकर*

No comments:

Post a Comment