चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद

 चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना  जेरबंद

एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त.नगरी दवंडी

श्रीगोंदा प्रतिनिधी : 

श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील इंगळेवस्तीवर ८ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यानी हल्ला करून धारधार हत्याराने मारहाण करत दुखापत करुन बळजबरीने सोन्याचे दागिने चोरुन नेल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास चालु असताना पो.नि.रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदार मार्फत कोळगाव परिसरात जबरी चोरी केलेले आरोपी लपले असल्याची माहिती मिळाली. त्या नुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांना सुचना देत कोळगाव येथे कोबिंग ऑपरेशन करत रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार उदाशा लालदाश्या भोसले वय 52 वर्षे, अतुल उदाशा भोसले वय 19 वर्षे , व एक विधिसंघर्षित मुलगा अश्या ३ जणांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीस गेलेले 30 हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने व एक चाकु ताब्यात घेण्यात आला. अटक केलेले आरोपीवर तळेगाव दाभाडे , आळेफाटा, पुणे ग्रामिण , नगर तालुका , पारनेर , बेलवंडी पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

                 तर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत मोटारसायकल चोर बापु साहेबराव कव्हाणे वय 23 वर्षे , रा.घोसपुरी ह.मु.काष्टी ता.श्रीगोंदा याला काष्टी येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन सुमारे एक लाख रुपये किंमतीची एक युनिकॉर्न व एक स्प्लेंडर अशा दोन मोटार सायकली हस्तगत केल्या. या आरोपी विरूद्ध अहमदनगर , पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि दिलीप तेजनकर, स.पो.नि विठ्ठल पाटील, स.फौ. भानुदास नवले , पो.हे.कॉ अंकुश ढवळे , पो.कॉ प्रकाश मांडगे , पो.कॉ संजय काळे , पो.कॉ गोकुळ इंगवले , पो.कॉ पो.कॉ दादा टाके , पो.कॉ किरण बोराडे , पो.कॉ योगेश सुपेकर यांनी केली आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here