ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या दिवशी दाखल करता येणार नामनिर्देशन पत्र - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या दिवशी दाखल करता येणार नामनिर्देशन पत्र

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या दिवशी दाखल करता येणार नामनिर्देशन पत्र



नगरी दवंडी

अहमदनगर  - राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आलेला आहे. अहमदनगर तालुक्‍यात 59 ग्रामपंचायतीमध्‍ये एकुण 216 प्रभागातुन 583 सदस्‍य निवडून द्यावयाचे आहेत. दि. 14 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द केली असुन एकुण पुरूष 63 हजार 898 व महिला 57 हजार 376 व इतर 2 असे एकुण 1 लाख 21 हजार 276 मतदारांचा  मतदार यादीत समावेश केला असुन अंदाजे 239 मतदान केंद्र असणार आहेत.

इच्‍छुक उमेदवारांनी आयोगाचे निर्देशानुसार http://panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन पध्‍दतीने फॉर्म भरणे आवश्‍यक असुन मागास प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जातपडताळणी पोहोच व हमीपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.

आयोगाचे निर्देशानुसार दि. 15 डिसेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्‍द केली असुन सदरची निवडणूक प्रक्रिया ही जिल्‍हा सैनिक लॉन, अहमदनगर जिल्‍हाधिकारी कार्यालयाजवळ अहमदनगर येथे स्विकारणेत येणार होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्‍तव संपुर्ण निवडणूक प्रक्रिया ही त‍हसिल कार्यालय, अहमदनगर, जिल्‍हा मध्‍य्वर्ती प्रशासकीय इमारत, टी.व्‍ही. सेंटर समोर, अहमदनगर येथे होणार आहे. उमेदवारांना दि. 23 ते 30 डिसेंबर 2020 रोजी (शासकीय सुट्ट्या वगळुन) नामनिर्देशनपत्र निवडणुक निर्णय अधिकारी यांचे समक्ष सादर करण्‍यात येतील. दाखल नामनिर्देशनपत्राची दि. 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपासुन ते छाननी संपेपर्यंत छाननी करण्‍यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दि. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेण्‍यासाठी मुदत असेल व तद्नंतर निवडणुक निर्णय अधिकारी हे अंतिम उमेदवारांस चिन्‍हवाटप करतील. दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान घेण्‍यात येणार असुन दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती तहसीलदार, नगर यांनी दिली आहे.

ऑनलाईन पद्धतीने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

अहमदनगर 21 डिसेंबर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे व जिल्‍हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात दि. 23 डिसेंबर 2020 या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍याकरीता ऑनलाईन पध्‍दतीने जिल्‍हास्‍तर युवा महोत्‍सव आयोजित करण्‍यात येणार आहे. या महोत्‍सवाचे आयोजन 15 ते 29 या वयोगटातील युवक युवतींकरीता सांघिक व वैयक्तिक प्रकारांमध्‍ये आयोजित करण्‍यात येणार आहे. सांघिक प्रकारामध्‍ये लोकनृत्‍य, लोकगीत व वैयक्तिक प्रकारांमध्‍ये एकांकीका (इंग्रजी/हिंदी), शास्‍त्रीय गायन (हिंदुस्‍तानी/कर्नाटकी), शास्‍त्रीय नृत्‍य, सितार, बासरी, तबला, वीणा, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गिटार, मणिपुरी नृत्‍य, ओडिसी नृत्‍य, भरतमाट्यम, कथ्‍थक, कुचिपुडी नृत्‍य, वक्‍तृत्‍व यांचा समावेश आहे. तरी जिल्‍ह्यातील शाळा, महाविद्यालय, संगीत अॅकॅडमी, नृत्‍य अॅकॅडमी, युवक मंडळे, कला मंडळे यांनी यामध्‍ये सहभागी व्‍हावे. आपला सहभाग नोंदविण्‍याकरीता आपली प्रवेशिका ज्‍यामध्‍ये शाळा/महाविद्यालय/संस्‍थेचे नाव, स्‍पर्धकाचे नाव, जन्‍मतारीख व वय, सादर करावयाची बाब, सादरीकरणाचा प्रकार, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, संपूर्ण पत्‍ता या बाबी मराठीमध्‍ये नमुद करूनdsoahmednagar01@gmail.com या मेलवर दि 22 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत पाठवाव्‍यात. स्‍पर्धा googlemeet वर आयोजित करण्‍यात येईल. Meet ची link व वेळ दि. 22 डिसेंबर 2020 रोजी  सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाठविण्‍यात येईल. अधिक माहितीकरीता क्रीडा अधिकारी श्रीमती दिपाली बोडके यांना 9511707103 या क्रमांकावर संपर्क करावा. तरी जिल्‍ह्यातील युवक युवतींनी यामध्‍ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. शेखर पाटील, जिल्‍हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment