विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल त्वरित जाहीर करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल त्वरित जाहीर करा

 विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल त्वरित जाहीर करा




नगरी दवंडी

 अहमदनगर: पुणे विद्यापीठयाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील 6 विद्यार्थ्यांच्या निकालात आलेल्या अडचणी तातडीने सोडवून सुधारित निकाल त्वरित जाहीर करावा. या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू), नाशिक विभागाकडून कुलगुरू डॉ. नितीन करमळ व परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. महेश काकडे यांना निवेदन देण्यात आले.

अहमदनगर येथील न्यू लॉ महाविद्यालय, न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालय व पुणे येथील विश्‍वकर्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गेल्या 5 दिवसांपासून पुणे विद्यापिठाला ई-मेल च्या माध्यमातून निकालात आलेल्या अडचणीबाबत तक्रार करीत आहे. परंतु त्यांच्या ई-मेलला अद्यापि कोणतेही उत्तर मिळालेले नाही. हे विद्यार्थी अतिशय तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जात असून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. कारण शून्य गुण, गैरहजर व अनपेक्षित एक किंवा दोन गुण असे ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालपत्रात आले आहे. यामुळे पदव्युत्तर शिक्षण प्रक्रिया, नोकरी अर्जही हे विद्यार्थी करू शकत नाही. अशा परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) चे विद्यार्थी प्रतिनिधीनी अ‍ॅड. सारस क्षेत्रे व इतर सहकारी यांनी या संदर्भात कुलगुरू तसेच परीक्षा संचालक यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांवर आलेलया अडचणी सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे

No comments:

Post a Comment