तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने केली नामंजूर,अटक पूर्व जामीन अर्जावर होणार या दिवशी सुनावणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने केली नामंजूर,अटक पूर्व जामीन अर्जावर होणार या दिवशी सुनावणी

 तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने केली नामंजूर,अटक पूर्व जामीन अर्जावर होणार या दिवशी सुनावणीी


 

नगरी दवंडी

अहमदनगर - बोठे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीच्यावेळी आरोपीला कोर्टासमोर हजर ठेवावे ही तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे.त्यामुळे बोठे याला कोर्टात उपस्थित राहण्याची गरज नाही. अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या (१५ डिसेंबर) सुनावणी होणार आहे.

या दिवशी जामीन अर्जावर पोलीस तपास यंत्रणेचे व सरकारी वकिलांचे कोर्टाने म्हणणे मागविले होते.त्यात पोलिसांनी पुढील सुनावणीच्या वेळी बाळ बोठे यानी कोर्टात उपस्थित राहण्याचा अर्ज न्यायालयात दिला होता, या अर्जावर आणि अटक पूर्व जमीन देण्याच्या मुद्द्यावर आज झालेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. नातू यांनी निकाल राखून ठेवला होता.

निकाल देतांना न्यायमूर्ती नातू यांनी उद्या मंगळवार दि.१५ रोजी याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment