अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 13, 2020

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखलश्रीगोंदा प्रतिनिधी : 


अल्पवयीन मुलीचा आंघोळ करतानाचे मोबाईल मध्ये व्हिडीओ चित्रीकरण करून ते सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली असून या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसात रामदास रोहिदास मोरे या आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

            या प्रकरणी सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ चित्रीकरण मोबाईल मध्ये करून ते सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर मागील नऊ महिन्यांपासून रामदास मोरे याने अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली असून पीडित मुलीने दि.१३ रोजी रात्री श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रामदास मोरे याच्या विरोधात पोक्सो, बलात्कार, विनयभंग अश्या विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरारी आरोपी रामदास मोरे हा विवाहित असून त्याला दोन मुलं असल्याची माहिती समजली असून या नराधमाने आंघोळीचा व्हिडीओ सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत मागील नऊ महिन्यापासून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला त्यामुळे या अल्पवयीन मुलीला दिवस गेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे प्रकरणाचा पुढील तपास सहायक पो. नि. विठ्ठल पाटील हे करत आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here