ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्य - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्य

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक



नगरी दवंडी

मुंबई - राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.


           मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर २०२० रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.

No comments:

Post a Comment