बबन कवादच्या जामीन रद्दसाठी उच्च न्यायालयात याचिका...... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 13, 2020

बबन कवादच्या जामीन रद्दसाठी उच्च न्यायालयात याचिका......

 बबन कवादच्या जामीन रद्दसाठी  उच्च न्यायालयात याचिका......


[  वराळ  हत्याप्रकरणातील 

फिर्यादी न्यायालयात : कवाद यांच्या अडचणीत वाढ ] 


पारनेर प्रतिनिधी

 तालुक्यातील निघोज येथील संदिप वराळ हत्या प्रकरणातील कटाचा आरोप असतेल्या बबन कवादचा जामीन रद्दसाठी  होण्यासाठी फिर्यादी रंगनाथ वराळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावनी औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती विभा कंकनवाड यांच्या समोर झाली. 

पुढील पाच जानेवारीला याबाबत न्यायालय निकाल देणार आहे.बबन कवाद सध्या जामीनावर बाहेर आहे.  यापुर्वीच कवाद यांच्या जामीनावर पोलिसांनीही आक्षेप घेतला आहे. 

  या हत्याप्रकरणाचा चुकीचा तपास झाल्याचे यापुर्वीच समोर आले आहे. या खटल्यातील तपासी अधिकारी  तथा  तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिक्षक  आनंद भोईटे 

यांना बनावट तपास केल्याप्रकरणी  न्यायालयाने दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते .त्यानंतर  भोईटे  यांनी या आदेशाला सर्वोच्च  न्यायालयातुन स्थगिती मिळवली आहे.

      बबन कवाद यांनी गेल्या चार वर्षापुर्वी निघोज येथे दारूबंदीसाठी पुढाकार घेतला होता. तसेच  निघोज येथील सरकारी जागेवरील  धनदांडग्यांचे  अतिक्रमन हटवले होते.  पतसंस्था , ग्रामपंचायत ,देवस्थान ट्रस्ट यांच्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला होता.कवाद यांच्याविरुद्धचा तडीपारचा प्रस्ताव  महीण्याभरापुर्वीच प्रांत अधिकाऱ्यांनी रद्द केला होता.

त्यानंतर लगेचच त्यांचा जामीन रद्द साठी फिर्यादी रंगनाथ वराळ यांनी याचिका दाखल केली आहे.महिण्यापुर्वी त्यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करून घराची तोडफोड केली होती.

कवाद यांना  जामीनावेळी न्यायालयाने निघोज गावात येण्यास मनाईची अट घातलेली आहे. त्यामुळे कवाद यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here