महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या सुपा शहराध्यक्षपदी तुषार बोरगे तर वाडेगव्हाण पंचायत समिती अध्यक्षपदी अनुज आढाव यांची निवड... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या सुपा शहराध्यक्षपदी तुषार बोरगे तर वाडेगव्हाण पंचायत समिती अध्यक्षपदी अनुज आढाव यांची निवड...

 महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या सुपा शहराध्यक्षपदी तुषार बोरगे तर वाडेगव्हाण पंचायत समिती अध्यक्षपदी अनुज आढाव यांची निवड...

   


     नगरी दवंडी

  

पारनेर प्रतिनिधी

      महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या पारनेर तालुक्यातील सुपा शहराध्यक्षपदी तुषार बोरगे यांची निवड तर वाडेगव्हाण पंचायत समिती गणाच्या अध्यक्षपदी अनुज आढाव यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मस्के यांच्या हस्ते बोरगे व आढाव यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

       महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप बाप्पू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस अनिल चितळे, प्रदेश उपाध्यक्ष डी. एन. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. 

      पुढील काळात पक्षाचे धेय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार असून शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे तसेच पक्ष संघटन वाढिसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे तुषार बोरगे व अनुज आढाव यांनी सांगितले.

      यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मस्के, पारनेर तालुका अध्यक्ष दिलीप जाधव, पारनेर तालुका उपाध्यक्ष बंडू बनकर, सुपा शहराचे युवानेते संदीप चव्हाण,संदीप वंजारे, अविनाश बोरगे, विशाल शिंदे, सोमनाथ पवार,  गणेश पवार, सोनू जाधव, रोहन वाघमारे ,सनी बोरगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment