भव्य मशालफेरीचे कर्जत शहरात आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

भव्य मशालफेरीचे कर्जत शहरात आयोजन

 भव्य मशालफेरीचे कर्जत शहरात आयोजन



नगरी दवंडी

कर्जत (प्रतिनिधी):-श्रमदान करून स्वच्छता करण्याच्या अमृमहोत्सवदिना निमित्त कर्जत शहरात स्वच्छता जनजागृतीसाठी  भव्य मशाल फेरी काढण्यात आली,  यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. 

              स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत करण्यासाठी स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ या स्पर्धेसह माझी वसुंधरा या स्पर्धेत ही भाग घेत कर्जत नगर पंचायतीला उच्च स्थानी नेण्याचा संकल्प शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केला आहे.  कर्जत शहरात दररोज सकाळी एक तास श्रमदान करण्याची गेली दोन वर्षां पासून राबविली जाणारी संकल्पना  पुढे नेत यावर्षी कर्जत शहरात स्वच्छता करण्यास २ आॅक्टो पासून सुरु झालेल्या या कामात अनेकांनी झोकून देत अविरत काम सुरू ठेवत सलग ७५ दिवसांचा टप्पा दि १५ डिसें रोजी पूर्ण केला. या अमृतमहोत्सव दिनानिमित्त कर्जत शहरात या सर्व श्रमप्रेमीनी  जनजागृतीची भव्य मशाल फेरी काढली. 

व कर्जत शहरातील सर्व नागरिकांना या स्वच्छता यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

             कर्जत शहरात सलग ७५ दिवस श्रमदान करून स्वच्छता करण्याच्या कामास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी विद्यालयाजवळ एकत्र येत हुतात्मा स्मारकाला नगर पंचायत स्वच्छता कर्मचार्यांच्या हस्ते पूजन वंदन करून या मशाल फेरीस सुरुवात झाली, अग्रभागी ज्येष्ठ श्रमप्रेमी मशाल घेऊन सहभागी झाले होते, सर्वात पुढे चालण्याचा मान नगर पंचायतच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आला. त्याचे मागे संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या वेषातील मुले रथावर होती, त्या मागे दादा पाटील एनसीसीचे कँडेट टीम, साईकृपा एकेडमीचे विद्यार्थी, आम्ही कर्जतचे सेवेकरीचे श्रमप्रेमी सहभागी झाले होते. त्याचे मागे कर्जत शहरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये तालुक्यातील बहिरोबावाडी,  कोळवडी, पठारवाडी

बाभुळगाव खालसा, राशीन, कुंभेफळ, टाकळी खंडे. या गावातील युवक ही सहभागी झाले होते. गेली ७५ दिवस सर्व श्रमप्रेमींना नियमित साथ देणारा स्वच्छतारथ आपले देखणे रूप घेऊन नागरिकांच्या मागे डौलाने  सहभागी होता, तर सर्वात शेवटी स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत भारत माता की जय सह इतर  जोरदार घोषणाबाजी करत गेली ७५ दिवस दररोज श्रमदान करणारे श्रमप्रेमी स्वच्छताप्रेमी एकसारख्या पिवळ्या टी शर्ट मध्ये सहभागी झाले होते. शेवटी नगर पंचायतच्या सात घंटागाड्या ही सहभागी झाल्या होत्या.

               कर्जत शहरातून निघालेल्या या भव्य मशाल फेरी विविध भागातून जात शेवटी शहाजीनगर येथे सांगता झाली,  या ठिकाणी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली, तर कर्जत नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यांनी या अभियानाची माहिती देत सर्वाचे आभार मानले. शेवटी राष्ट्रगीता ने मशाल फेरीची सांगता झाली.

चौकट - 

विविध सामाजिक संघटनांनी आयोजित केलेल्या या मशाल फेरीत कोणत्याही संघटनेचे अथवा व्यक्तीचे नाव घ्यायचे नाही यावेळी कोणताही इतर कार्यक्रम  अथवा कोनाचेही मनोगत होणार नाही असे ठरविण्यात आले होते.  त्याचे काटेकोर पणे पालन करण्यात आल्याचे पहावयास मिळत होते. ही मशाल फेरी यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment