भालसिंग हत्या प्रकरणात आरोपी जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

भालसिंग हत्या प्रकरणात आरोपी जेरबंद

 भालसिंग हत्या प्रकरणात आरोपी जेरबंदनगरी दवंडी

अहमदनगर : नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग यास अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी इंद्रजीत रमेश कासार यास स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले आहे. वाळकी येथे विश्वजीत प्रतिष्ठानच्यावतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावेळी विरोध केल्याचा राग मनात धरुन दि.17 नोव्हेंबर रोजी विश्वजीत कासार व त्याच्या इतर साथीदारांनी ओंकार बाबासाहेब भालसिंग याला जबर मारहाण केली होती. जखमी भालसिंग याच्यावर पुणे येथे उपचार चालू असताना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात कासार व त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपी कासार याला वाळकी येथे जावून शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना सुनिल चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश वाघ, विजय धनेधर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांनी सहभाग घेतला.  आरोपी इंद्रजीत रमेश कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द कोतवाली, नगर तालुका, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here