भिंगार सदर बाजार नागरिकांचा सोमवारी कॅन्टोन्मेंट बोर्डावर मोर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 17, 2020

भिंगार सदर बाजार नागरिकांचा सोमवारी कॅन्टोन्मेंट बोर्डावर मोर्चा

 भिंगार सदर बाजार नागरिकांचा सोमवारी कॅन्टोन्मेंट बोर्डावर मोर्चा

पिण्याचे व वापरण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भिगार च्या सदरबाजार मधील सर्व नागरिकांना  गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला पाणीपट्टी वेळेवर भरून सुद्धा पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही वर्षातून 100 ते 120 दिवस पाणी अपुरे व कमी दाबाने सोडले जाते ,त्यामुळे पिण्यासाठी व वापरासाठी पाणी विकत घ्यावे लागते हक्काचे पाणी मिळत नाही , आज कँटोन्मेंट बोर्ड त्यांच्या पदाचा गैरवापर करून सर्व जनतेला नाहक वेठीस धरत आहे. यामुळे सोमवार दि. 21 रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपल्या हक्कासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  महेश नामदे व प्रकाश लुणिया यांनी केले आहे.
आपल्या शांततेचा व सहनशीलतेचा  कँटोन्मेंट बोर्ड  गैरफायदा घेत आहे .त्यासाठी आपण सर्वजण वार्डभेद ,राजिकाय पक्ष मतभेद विसरून एकजूट होऊन   कँटोन्मेंट बोर्ड ला जाब विचारण्यासाठी तसेच नियमित पुरेशा दाबाने भरपूर पिण्याचा पाणीचा पुरवठा होण्यासाठी कँटोन्मेंट बोर्ड कार्यलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे .
भिगार व सदरबाजार मधील सर्व लहान मोठे व्यापारी ,भाजीपाला व्यवसायिक ,चहा व्यवसायिक ,टपरी चालक आदी सर्वानी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपली दुकाने ,व्यवसाय बंद ठेऊन निषेध करण्यासाठी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहेत सोमवार दि 21-12-2020 रोजी सकाळी 11 वाजता सर्वानी श्री मारुती मंदिर भिगार वेशीजवळ जमा व्हावे यावेळी सर्वानी सुरक्षित अंतर ठेऊन व मास्क लावून या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here