दैनंदिन वापरातील या वस्तूच्या किंमतीत वाढ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

दैनंदिन वापरातील या वस्तूच्या किंमतीत वाढ

 दैनंदिन वापरातील या वस्तूच्या किंमतीत वाढनगरी दवंडी

मुंबई :वाढती महागाई, आर्थिक संकट आणि अशातच जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर खिशाला कात्री लावणारे आहेत. सध्या महागाई वाढते आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये तेल कंपन्यांनी मोठी वाढ केली असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.

आपल्या घरात इतर कुठलीही गोष्ट नसली तरी चालते सिलेंडर मात्र हवा असतो. १८ रुपयांनी पाच किलोच्या गॅसच्या किंमती वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे आता ३६.५० रुपये जास्त १९ किलो सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार आता दिल्लीमध्ये १४.२ किलोचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना झाला असून तो कोलकात्याने ६७०.५० रुपये तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोहचला आहे.६६० रुपये चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागत आहेत.दिल्लीमधील १९ किलोच्या सिलिंडरची किंमत एक हजार २९६ रुपये, एक हजार ३५१ रुपये ५० पैसे कोलकात्यामध्ये, एक हजार २४४ रुपये मुंबईमध्ये आणि एक हजार ४१० रुपये ५० पैशांपर्यंत चेन्नईमध्ये गेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here