निर्मल नगर मध्ये दोन गटात भांडण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

निर्मल नगर मध्ये दोन गटात भांडण

 निर्मल नगर मध्ये दोन गटात भांडण



नगरी दवंडी

अहमदनगर:  जुन्या भांडणाच्या कारणातून सावेडीच्या निर्मलनगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामार्‍या झाल्या. या हाणामार्‍यात दोन्ही गटाकडून लोखंडी रॉड, लाकडी दांडके, मिरची पुडचा वापर करण्यात आला. एका गटाने दुसर्‍या गटाच्या सहा दुचाकी पेटून देत नुकसान केले आहे. याप्रकरणी दोन्ही गटाने तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

दिपक नामदेव सावंत (रा. निर्मलनगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावळेराम ठोकळ व अनोळखी सात ते आठ इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या गटाच्या मंदा अरूण ठोकळ (रा. निर्मलनगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपक सावंत, तुषार थोरवे, गजानन सावंत व चार ते पाच अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सावेडीच्या निर्मलनगरमध्ये दोन गटात हाणामारी सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण सुरसे यांना मिळताच त्यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. दुचाक्यांना लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन बोलवून आग नियंत्रणात आणली. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक किरण सुरसे करीत आहे.

No comments:

Post a Comment