अनेक वर्षापासून फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

अनेक वर्षापासून फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 फरारी आरोपींच्या पोलिसांनी अवळल्या मुसक्या 

पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची कारवाई नगरी दवंडी

जामखेड प्रतिनिधी 

अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलीसांना गुंगारा देऊन फरार आसलेल्या सात आरोपींच्या मुसक्या आवळुन त्यांना जेरबंद केले आहे. जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पोलीसांनी केली आहे. 


जामखेड ला नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुन्हेगारी चा बीमोड करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक व जामखेड पोलीस स्टेशन यांनी सदरची मोहीम हाती घेतली आहे. त्या दृष्टीने जामखेड पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांचे एक भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी नंदकिशोर खरात व दादासाहेब खरात दोन्ही रा. हळगाव, बळीराम गणपत वाघमारे रा. देवदैठण, एक महीला रा. वाकी. महालिंग मोहीते रा. पिंपळगाव आळवा, त्रिंबक गोपाळघरे, रा मोहरी, मनोज बबन हळनोर रा. मोहरी ता. जामखेड अशा एकुण गंभीर गुन्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी पकडण्याची कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि महेश जानकर, पो हे कॉ संजय लाटे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी आबासाहेब अवारे संदिप राऊत अरुण पवार संदिप आजबे यांच्या पथकाने केली आहे. तसेच येथुन पुढे देखील अशीच कारवाई सुरूच रहाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here