श्री संत सावता माळी युवक संघ व फुले ब्रिगेड यांच्यावतीने सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

श्री संत सावता माळी युवक संघ व फुले ब्रिगेड यांच्यावतीने सन्मान

 श्री संत सावता माळी युवक संघ व फुले ब्रिगेड यांच्यावतीने सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः समाजातील वंचित घटकांसाठी काम करणार्या अनेक संघटना आहेत. समाजातील दु:ख कमी करण्यासाठी या संघटना, व्यक्ती आपआपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. यातून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्त होत आहे. आपण करत असलेल्या कामातून संघटन करुन समाजहितासाठी काम करणार्या व्यक्तींच्या कार्याची दखल ही नेहमीच घेतली जात असते. हेमंत जाधव व स्वप्नील कुर्हे यांनी आपल्या कार्यातून समाजापुढे एक आदर्शवत काम केले याबद्दल त्यांना मिळालेला पुरस्कार हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे कार्य पुढेही असे निरंतर सुरु राहील. त्यांच्या कार्यास पाठबळ देण्याचे काम सर्वांना करावयाचे आहे, असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांनी केले.
श्री संत सावता माळी युवक संघ व फुले ब्रिगेड यांच्यावतीने सह्याद्री भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हेमंत जाधव व कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वप्नील कुर्हे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, समता परिषद महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, फुले बिग्रेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, दिग्दर्शक स्वप्नील मुनोत, प्रदेश सोशल मिडियाचे दिपक साखरे, उद्योजक संजय जाधव, आशिष भगत, संतोष हजारे, शरद कोके आदि उपस्थित होते.
याप्रसंगी दिपक खेडकर म्हणाले,   हेमंत जाधव व स्वप्नील कुर्हे यांनी मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या नि:स्वार्थ कार्याची पावती आहे. समाजासाठी ते आदर्शवत असेच आहे. त्याच्या कार्याचा उचित सन्मान झालाही आमच्या दृष्टीने गर्वाची गोष्ट आहे. समाजहित जोपासर्या व्यक्तींचा मागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे, त्यांच्या कार्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, यासाठी त्यांच्या कार्यात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या सन्मानातून केले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी हेमंत जाधव व स्वप्नील कुर्हे यांनी सत्काराबद्दल आभार मानून सांगितले की, आपण करत असलेल्या कामाबरोबरच सामाजिक भाव जपला पाहिजे. हे आपले कर्तव्यच आहे या भावनेतून काम करत राहिले, अनेक लोक आपल्याशी जोडले जातात आणि एक चांगले काम उभे राहत असते. या सत्कारामुळे आम्हाला काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रा.माणिकराव विधाते, दत्ता जाधव आदिंनी आपल्या मनोगतातून हेमंत जाधव व स्वप्नील कुर्हे यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक साखरे यांनी केले तर आभार शरद कोके यांनी मानले.

No comments:

Post a Comment