कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या डॉ.निलेश शेळके यास अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या डॉ.निलेश शेळके यास अटक

 कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या डॉ.निलेश शेळके यास अटक



नगरी दवंडी


अहमदनगर - बनावट कर्ज प्रकरणातील आरोपी डॉ. नीलेश शेळके यास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी रुपयांचा अपहार करून घेऊन गंडा घालणारा नगरमधील प्रतिथयश डॉक्टर निलेश शेळके याच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत तसेच पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे.२०१४ साली डॉ. सुजाता नीलेश शेळके (वय ३८) यांनी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी त्यांचे पती डॉ. नीलेश विश्वास शेळके व इतर चौघांविरुद्ध डॉ. सुजाता यांचा चारित्र्याच्या संशयावरून छळ करून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे.एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. निलेश शेळके याने अनेक डॉक्‍टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले.त्यानंतर शहर सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्‍टरांच्या नावाने कर्ज घेत त्या रकमेचा अपहार केला.या प्रकरणी दोन महिलांसह एकूण तीन डॉक्‍टरांनी प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणुकीची फिर्याद दिली आहे.डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे, डॉ. श्रीखंडे यांनी फिर्याद दिली आहे.

No comments:

Post a Comment