नवीन टिळक रोड ते हॉटेल राज पॅलेस दरम्यानच्या रस्त्याची अनावश्यक उंची कमी करुन काँक्रीटीकरण करा : आ संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

नवीन टिळक रोड ते हॉटेल राज पॅलेस दरम्यानच्या रस्त्याची अनावश्यक उंची कमी करुन काँक्रीटीकरण करा : आ संग्राम जगताप

 नवीन टिळक रोड ते हॉटेल राज पॅलेस दरम्यानच्या रस्त्याची अनावश्यक उंची कमी करुन काँक्रीटीकरण करा : आ संग्राम जगताप 
नगरी दवंडी

अहमदनगर : नवीन टिळक रोड ते हॉटेल राज पॅलेस दरम्यानच्या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन दिला आहे. 

दोन्ही टिळक रोडला जोडणारा हा रस्ता खराब झाला होता. येथे रहदारी खुप आहे. हा रस्ता व्हावा अशी नागरिकांची मागणी होती.

परंतू अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा भाग खाली व रस्ता वर आल्यामुळे येथील व्यावसायिक, गाळेधारकांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. तरी रस्त्याचे आता पर्यंत झालेले काम

खोदून रस्त्याची अनावश्यक वाढलेली उंची कमी करण्याचे आदेश आ. संग्राम जगताप यांनीमनपा अभियंता श्रीकांत निंबाळकर व ठेकेदार यांना दिले.राज पॅलेस ते नवीन टिळक रोड रस्ता कामाची पाहणी आ. संग्राम जगताप यांनी केली असता तेथील रहिवासी व व्यावसायिकांनी याबाबतची कैफियत त्यांच्या पुढे मांडली. त्यानंतर आ. जगताप यांनी तातडीने याची दखल घेत मनपा अभियंता व ठेकेदार यांची कानउघडणी केली व रस्त्याची अनावश्यक वाढलेली उंची तातडीने कमी करून काँक्रीटीकरण करण्याचे आदेश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here