आष्टी येथील गंगाई-बाबाजी महोत्सव कोरोनामुळे रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

आष्टी येथील गंगाई-बाबाजी महोत्सव कोरोनामुळे रद्द

 आष्टी येथील गंगाई-बाबाजी महोत्सव कोरोनामुळे रद्द

नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाने भगवान महाविद्यालयामध्ये गेली सोळा वर्षापासून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या मात्यापित्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात येत असलेला गंगाई -बाबाजी महोत्सव यावर्षी कोव्हीड-19मुळे रद्द करण्यात येत असल्याची माहिती भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय वाघ यांनी दिली.
  आष्टी तालुक्यातील नामांकित असलेल्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी राज्यस्तरीय गंगाई बाबाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. या महोत्सवामध्ये विद्यालयातील, कथाकथन काव्यवाचन, व वक्तृत्व, स्पर्धा तसेच खुल्या लावण्या, लावणी नृत्य, व गोंधळ गीत,या कला प्रकारांचा अंतर्भाव असतो.या मोत्योवासाठी राज्य भरातील अनेक विद्यालयातील खुल्या गटातील अनेक नामवंत कलाकार सहभाग घेत असल्यामुळे या महोत्सवाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे परंतु यावर्षी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवण्याचे व कोरोना चा संसर्ग रोखण्याचे अहवान आपल्यामुळे हा महोत्सव रद्द करावा लागत आहे पुढील वर्षापासून हा महोत्सव नियोजित वेळेत आयोजित केला जाईल असेही प्रचार्‍य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment