मेडिकल हे आपले आरोग्य मित्रच - बोराटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

मेडिकल हे आपले आरोग्य मित्रच - बोराटे

 मुकुंदनगर येथील सिटी मेडिकलचे उद्घाटन

मेडिकल हे आपले आरोग्य मित्रच - बोराटे

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. जेव्हा आजाराची सुरुवात होते, तेव्हा सर्वांत प्रथम आपण मेडिकलमधून औषधे घेतो. कारण मेडिकलवालाच आपल्याला मार्गदर्शन करुन आजाराचे स्वरुप सांगत असतो. त्यामुळे अनेक छोट-छोट्या आजारांवर मेडिकलमधील औषधामुळे फरक पडत असतो. त्यामुळे मेडिकल हे आपले आरोग्य मित्र असतो. अनेक आजारांना वेळीच पायबंद घालण्याचे काम मेडिकलमधील औषधामुळे होत असल्याने मेडिकल हा आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. मेडिकल हा नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवणारा सेवाभावी व्यवसाय आहे. या मेडिकलमधून शेख मुश्तफा हे लोकाभिमुख सेवा देतील, असा विश्वास नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी व्यक्त केला.
मुकुंदनगर भागात सुरु करण्यात आलेल्या सिटी मेडिकलचे उद्घाटन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी परेश लोखंडे, डॉ.जहीर मुजावर, रऊफभाई मुजावर, जफरभाई अमजद पठाण, असिफ पटेकर, अवेज सय्यद, हाजी फकीर महंमद पठाण, शेख अवेज, संचालक शेख मुश्ताफा आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here