स्व.राठोड यांची प्रेरणा घेऊन शहरात शिवसेना काम करणार : विक्रम राठोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

स्व.राठोड यांची प्रेरणा घेऊन शहरात शिवसेना काम करणार : विक्रम राठोड

 स्व.राठोड यांची प्रेरणा घेऊन शहरात शिवसेना काम करणार : विक्रम राठोड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये संपूर्ण भारत लॉक डाऊन करण्यात आला होता जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व बंद होते यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना काम बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती हे लक्षात येतात स्वर्गीय अनिल राठोड यांनी या लोकांसाठी दररोज अन्न वाटप सुरू केले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हे समाजसेवेचे काम अहोरात्र सुरू ठेवले आणि नागरिकांना या कोरोना-या महामारीत आधार देण्याचे काम केले. स्वर्गीय अनिल राठोड यांची प्रेरणा घेऊन नगर शहरात शिवसेना काम करणार असे प्रतिपादन युवा सेना जिल्हा अध्यक्ष विक्रम राठोड यांनी केले.
    हिंदू धर्म रक्षक अनिल राठोड यांच्या संकल्पनेतून कोविड महामारी च्या काळात ज्या कोविड योद्ध्यांनी जीवाची परवा न करता गोरगरिबांना अन्नछत्र द्वारे भूक भागवली अशा 90 योद्धाचे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे युवा सेना जिल्हा अध्यक्ष विक्रम राठोड शहर प्रमुख दिलीप सातपुते माजी महापौर अभिषेक कळमकर भगवान फुलसौंदर नगरसेवक बाळासाहेब बोराटे श्याम नळकांडे मदन आढाव अनिल बोरुडे विशाल वालकर गिरीश जाधव अशा निंबाळकर अरुण गोयल डॉक्टर सुनील पोखरणा शिवाजी शिर्के संतोष गेनाआप्पा, संग्राम कोतकर हर्षवर्धन कोतकर संग्राम शेळके पारूनाथ ढोकळे पप्पू भाले योगीराज गाडे सुनील तिवारी अशोक दहिफळे गौरव ढोणे संजय आव्हाड प्रणील शिंदे अक्षय नागापुरे दत्तात्रेय नागापुरे मुन्ना भिंगार दिवे दीपक कावळे सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी शशिकांत गाडे म्हणाले स्वर्ग अनिल राठोड हे कधीच कोणत्याही जन कार्य करण्यासाठी मागे हटले नाही त्यांनी कायम सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना प्राधान्य दिले सामान्य कार्यकर्त्याला मोठे करण्याचे काम त्यांनी केले आम्ही सर्व विक्रम राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत                                 याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले चांगले आणि समाजहिताचे काम करणार्‍या नागरिकांचा गौरव अनिल राठोड यांनी कायम केले. शिवसेनेचे काम पहिल्यासारखे यापुढेही कायम सुरू राहतील.

No comments:

Post a Comment