चांगल्याप्रकारे प्रामाणिकपणे उपचार करणार्‍या डॉक्टरांची रुग्णांना गरज : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

चांगल्याप्रकारे प्रामाणिकपणे उपचार करणार्‍या डॉक्टरांची रुग्णांना गरज : आ. जगताप

 चांगल्याप्रकारे प्रामाणिकपणे  उपचार करणार्‍या डॉक्टरांची रुग्णांना गरज : आ. जगताप

सिव्हील हडको येथे डॉ. पानसरे(छाती विकार तज्ञ) क्लिनिकचे उद्घाटन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  विविध आजार आजच्या काळात आपण पाहत आहोत.त्या आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची गरज कायम असते जो सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल असा. कारण सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात खर्च करणे शक्य नाही.म्हणून चांगल्याप्रकारे प्रामाणिकपणे उपचार करणार्‍या डॉक्टरांची रुग्णांना गरज. असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
सिव्हील हडको येथे डॉ. पानसरे(छाती विकार तज्ञ) क्लिनिकचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी नगरसेवक कुमार वाकळे, विपुल वाखुरेपाटील, समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी , केरुनाथ पानसरे, गोविंद मोकाटे, डॉ.सचिन पानसरे, डॉ.सौ.अंजली पानसरे, डॉ.संभाजीराजे मिस्कीन, अमित खामकर, काशिनाथ पानसरे, डॉ.रंगनाथ मते, प्रशांत दारकुंडे, बाळासाहेब पवार, निखील वारे, संपत नलवडे, डॉ.प्रशांत तुवर, डॉ.सिणारे,  डॉ. अभिजित सांगळे आदी उपस्थित होते.
     संग्राम जगताप पुढे म्हणाले डॉ. सचिन पानसरे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना सामान्य माणसाची व्यथा आणि त्याची प्रत्येक अडचण माहित आहे. रुग्णांना आजारांवर चांगला सल्ला औषधे देण्याचे काम याठिकाणी होणार आहे. यामुळे ते रुग्णांचा योग्य प्रमाणिक मार्गाने चांगला उपचार करून स्वताचे नाव लौकिक करतील.
    माहिती देतांना डॉ. सचिन पानसरे म्हणाले या क्लिनिक मध्ये जुनाट वारंवार खोकला, दमा, बालदमा, जुनाट दमा, सतत सर्दी, श्वसन मार्गाची अ‍ॅलर्जी, छातीत कफ होणे, छातीत घरघर/ शिट्टीसारखा आवाज येणे, क्षयरोग(टी.बी.), न्यूमोनिया, कॅन्सर, छातीमध्ये पाणी होणे किंवा गाठ होणे, झोपेमधील श्वसनाचे आजार घोरणे आशा विविध आजारांवर योग्य उपचार तसेच दमा रोग निदान तपासणी व दमा तिव्रता मापन तपासणी, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस व श्वसन मार्गाची तपासणी केली जाणार आहे. पोस्ट कोविड उपचार पण याठिकाणी उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment