टाकाऊ कचर्‍यामुळे शहराचे विद्रुपीकरण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

टाकाऊ कचर्‍यामुळे शहराचे विद्रुपीकरण.

 टाकाऊ राडारोड्याचे व्यवस्थापन करण्याची हरिभूमि प्रतिष्ठानची महापौरांकडे मागणी.

टाकाऊ कचर्‍यामुळे शहराचे विद्रुपीकरण.

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अहमदनगर शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ राडारोड्याचे / डेब्रिजचे अस्ताव्यतपणे पडलेले ढीगारे दिसून येतात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊन शहराचे विद्रुपीकरण होते.
त्यामुळे नगर शहरात डेब्रिज / बांधकामाच्या टाकाऊ राडारोड्याचे व्यवस्थापन करण्यात यावे, अशी मागणी हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    निवेदनात म्हटले आहे की, डेब्रिज टाकण्यासाठी शहरात विविध भागात डेब्रिज डम्पींग ग्राऊंड तयार करण्यात यावेत. तेथे त्याचे विलगीकरण करुन दगड, डबर, मुरूम, माती वेगवेगळे साठविण्यात यावेत. तसेच गरजेनुसार त्याचा पुनर्वापर करण्यात यावा. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 चा एक भाग म्हणून याबाबत धोरण निश्चीत करण्यात यावे, अशी मागणी अभय ललवाणी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here