ओबीसींचे मजबूत संघटन करुन प्रश्न सोडविणे ही जबाबदारी ः ना. वडेट्टीवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

ओबीसींचे मजबूत संघटन करुन प्रश्न सोडविणे ही जबाबदारी ः ना. वडेट्टीवार

 ओबीसींचे मजबूत संघटन करुन प्रश्न सोडविणे ही जबाबदारी ः ना. वडेट्टीवार

ओबीसी महासभा शहराध्यक्षपदी अनिल निकम

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अखिल भारतीय ओबीसी महासभा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अहमदनगर शहर अध्यक्षपदी अनिल निकम यांची नियुक्ती करुन ओबीसी मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.भारत दिवटे माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, चंद्रकांत फुलारी, डॉ.सुदर्शन गोरे, आनंद लहामगे, हरिभाऊ डोळसे, राजेश सटाणकर आदि उपस्थित होेते.
     याप्रसंगी बोलतांना ना.विजय वडेट्टीवार म्हणाले, राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या ओबीसी समाज मागासलेला आहे. 60 टक्के असलेला हा समाज गेल्या 70 वर्षांपासून उपेक्षित आहे. ओबीसींचे मजबूत संघटन करुन विविध प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत ते सोडविणे त्यासाठी ओबीसींची वज्रमुठ अधिक बळकत करण्याची जाबाबदारी आपली आहे.  ओबीसी महासभा संघटनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांचे, उद्योजकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे आपली जबाबदारी आहे. ते सोडवून शासनाच्यावतीने ओबीसींसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देण्याचा प्रयत्न संघटनेने करावा, यासाठी आम्ही आपल्या सोबत राहू, असे सांगितले.
    नियुक्तीनंतर नूतन शहराध्यक्ष अनिल निकम म्हणाले, आजही ओबीसी समाज हा विखुरलेला आहे, तो जागरुक होऊन एक झाल्याशिवाय ओबीसींना भवितव्य नाही. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला एकत्र करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे हक्क मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करु, असे सांगितले.
   अनिल निकम यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment