ग्राहकांची फसवणूक थांबण्यासाठी संघटना कटिबध्द ः तुकाराम महाराज निंबाळकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

ग्राहकांची फसवणूक थांबण्यासाठी संघटना कटिबध्द ः तुकाराम महाराज निंबाळकर

 ग्राहकांची फसवणूक थांबण्यासाठी संघटना कटिबध्द ः तुकाराम महाराज निंबाळकर

ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश चांदणे यांची नियुक्ती

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः ग्राहक कल्याण फाउंडेशनची (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी उपाध्यक्ष रामचंद्र तांबे, राज्य कार्यवाहक सतीश कातोरे, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रवीण चौधरी उपस्थित होते. या बैठकित निलेश नामदेवराव चांदणे यांची सर्वानुमते अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांच्या हस्ते चांदणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
     या बैठकित ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. विविध वस्तू खरेदी करताना, स्वस्त धान्य दुकान, मेडिकल अन्य काही वस्तू खरेदीवर ज्यादा पैसे अथवा ग्राहकांचा फसवणुक झाल्यास फसवणुक करणार्या दुकानदारांवर ग्राहक मंचात कशा पध्दतीने कारवाई केली जाते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.  
     तसेच यावेळी फाऊंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पंकज कर्डिले, जिल्हा कार्यवाहक गणेश बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, भगवान जगताप, किशोर पवार, सुनील सकट, गणेश ढोबळे, तुषार वाघमारे, प्रशांत पवार, नितीन लांडगे, मुन्ना पवार, मंगेश शिंदे, अरुण इनामदार, सिताराम नवले, प्रवीण गव्हाणे, अस्लम तांबोळी, संतोष मगर, चिंतामणी गिरमकर, विकास महाजन आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांनी नुतन पदाधिकार्यांना ग्राहकांच्या न्याय, हक्कासाठी काम करण्याचे आवाहन करुन ग्राहकांची फसवणुक थांबण्यासाठी संघटना कटिबध्द असल्याचे सांगितले. तर नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नूतन पदाधिकार्यांचे या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment