चिनी मांज्यावर बंदी घालण्याची हरियाली संस्थेची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

चिनी मांज्यावर बंदी घालण्याची हरियाली संस्थेची मागणी

 चिनी मांज्यावर बंदी घालण्याची हरियाली संस्थेची मागणी

मांज्यात अडकलेल्या गव्हाणी घुबडास दिले जीवदान

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः चीनी मांज्याच्या अतीवापरामुळे होणा-या गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी या मांज्याच्या वापरावर बंदि आणावी व विक्री करणा-यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथिल हरियाली संस्थेच्या वतिने जिल्हाधिकारी डाँ.राजेंद्र भोसले याच्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच चीनी मांज्यात अडकलेले गव्हाणी घुबड या पक्षांची मांज्यातुन मुक्तता करुन त्यास सुरेश खामकर यांनी जिवदान देवुन निसर्गात मुक्त केले आहे.
     संक्रातीनिमित्त अनेक वर्षापासुन पतंग उडविण्यासाठी बंदी असतानादेखील चीनी मांज्याचा वापर मोठ्या प्रमाणात व सर्रासपणे केला जातो. त्यामुळे हा मांज्या दुचाकीस्वार तसेच रस्त्याने पायी चालणारे नागरिक यांच्या मानेला अडकुन अपघात होणे. दुखापत होणे अश्या गंभीर व जिवघेण्या दुर्घटना या पुर्वी घडल्या असुन आताही घडत आहेत.
    तसेच आकाशात मुक्त विहार करणारे पक्षी हे जहजपणे या चीनी मांज्यात अडकल्यामुळे  अनेक पक्षांनां दुखापत होण्याबरोबरच जिव गमवावा लागल्याच्या घटना यापुर्वी घडल्या असुन आताही घडत आहेत.
नुकतेत नगर शहरातील पटवर्धन चौकातील एका उंच इमारतीवर या मांज्यात गव्हाणी घुबड  हा पक्षी अडकुन लटकत होता, नागरीकांच्या सतर्कतेमुळे सुरेश खामकर यांनी त्यास मांज्यातुन मुक्त करुन जिवदान दिले.अश्या स्वरुपाच्या गंभीर घटना टाळण्यासाठी चीनी मांज्याच्या वापरावर व विक्रीवर बंदी आणावी. हा मांज्या विकणा-या विक्रेत्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हरियाली संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी डाँ. राजेंद्र भोसले यांच्याकडे हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड, संजय राहुरकर, विष्णु नेटके, रंगनाथ सुंबे, दिपक परदेशी आदिनीं निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment