नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : आ. जगताप

 नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : आ. जगताप


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः समाजातील गरजू व वंचितांची सेवा ही ईश्वर सेवेसमान आहे. सामाजीक बांधीलकीच्या भावनेतुन व सकारात्मक  दृष्टीकोनातुन नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचे सामाजीक कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आ. संग्राम जगताप यांनी काढले.
      नगरसेवक कुमार सिंह वाकळे यांच्या वाढदिवसानिमीत्त एमआयडीसी येथील आठरे पाटील बालसुधार गृह येथे  आ. जगताप यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, राजेश कातोरे, निखील वारे, बाळासाहेब पवार, रमेश वाकळे, नवनाथ कोलते, राम काते, विकी देठे, सुरज कोलते, प्रविण कोलते, दशरथ वाकळे, बाळु मुंगसे, जालुभाऊ मुंगसे, गणेश वाकळे, संतोष वाटमोडे, गजेंद्र ससे, नवनाथ कराळे, योगेश भोसले, उत्तम भिंगारदिवे, आकाश कोलते, राहुल कराळे, शंकर कराळे, सारंग कराळे, सचिन कराळे, संपत वाकळे, राम वाकळे, गौरव वाटमोडे, संपत वाटमोडे, सोमनाथ कराळे, गोरख कोलते, गौतम कापडे, सावळेराम कापडे, भाऊ परदेशी, बिपीन काटे, करण वाकळे, सोमनाथ वाटमोडे, राहुल वाटमोडे, गौरव परदेशी, प्रविण अकोलकर, बंटी सय्यद, सिमन भाकरे आदी उपस्थित होते.
     यावेळी कुमारसिंह वाकळे म्हणाले की, सण, उत्सव, वाढदिवस आदी आनंदी क्षणांमध्ये गरजू वंचितांना मदत केली पाहीजे. सार्वजनिक जीवनात कार्य करत असतांना जनसेवा हे कर्तव्य समजून वंचितांना आधार दिला पाहिजे.

No comments:

Post a Comment