शहरी कचर्‍याचे विलगीकरण होणे आवश्यक : राहुल अहिरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

शहरी कचर्‍याचे विलगीकरण होणे आवश्यक : राहुल अहिरे

 शहरी कचर्‍याचे विलगीकरण होणे आवश्यक : राहुल अहिरे

नागरिकांनी किचन वेस्टपासून कंपोस्ट खत बनवावे


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या सर्वेक्षण 2021  व राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान भाग घेतला आहे. या अभियानात यशस्वी होण्यासाठी तसेच मानांकन मिळवण्यासाठी शहरात दैनंदीन संकलित होणार्‍या कचर्‍याचे विलगीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे कचर्‍यावर प्रक्रीया करणे सोपे होते. नागरिकांनी किचन वेस्टवर आपल्या परसबागेत प्रक्रिया केल्यास बागेतील झाडांसाठी उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार होऊ शकेल. याच बरोबर महानगर पालिकेला घनकचरा व्यवस्थापन व प्रकीयेसाठी मोठी मदत होऊ शकेल. त्यामुळे शहरातील जास्तीत नागरिकांनी किचन वेस्ट पासून कंपोस्ट खत तयार करावे असे आवाहन स्वच्छ भारत अभियानाचे प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे व सौरभ जाधव यांनी केले आहे.
    रेल्वे स्टेशन परिसरातील मल्हार चौक येथील अभय ललवाणी हे गेल्या चार वर्षांपासून किचन वेस्ट पासून कंपोस्ट खत तयार करण्याचा उपक्रम राबवित आहेत, त्याची पाहणी श्री अहिरे यांनी केली.  यावेळी अभियानाचे शहर समन्वयक लक्ष्मण लांडगे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here