एच.पी.व्ही. लस घेतल्याने गर्भाशय पिशवीच्या तोंडाचा कर्करोग समूळ नष्ट करता येतो ः डॉ. वांडेकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

एच.पी.व्ही. लस घेतल्याने गर्भाशय पिशवीच्या तोंडाचा कर्करोग समूळ नष्ट करता येतो ः डॉ. वांडेकर

 एच.पी.व्ही. लस घेतल्याने गर्भाशय पिशवीच्या तोंडाचा कर्करोग समूळ नष्ट करता येतो ः डॉ. वांडेकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आजच्या धावत्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्या कडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झालेले रुग्ण दिसून येतात. आजारांबद्दल असणारी अजाणता आणि गैरसमज यामुळे आरोग्य धोक्यात आल्याचे  लक्षात येते. आज भारतात दरवर्षी 30000 हजार पेक्षा जास्त अधिक महिलांना गर्भाशय पिशवीचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे.  एच.पी.व्ही. (र्कीारप झरळिश्रश्रेार तर्ळीीी) तपासणी करून वेळीच प्रतिबंधात्मक लस दिल्याने  पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरची धोका टळू शकतो. एच.पी.व्ही. लसीकरणाने पिशवीचा तोंडाचा कर्करोग समूळ नष्ट करता येवू शकतो असे प्रतिपादन केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डाँ. अभिजित वांडेकर यांनी केले.
    कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन, मुबई, विखे फौंडेशन हॉस्पिटल आणि   स्नेहालय संचलीत केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एच.पि.व्ही. लसीकरण उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. प्रवीण मुत्याल (सदस्य, बाल कल्याण समिती, अहमदनगर), डॉ. गणेश मिसाळ (बालरोग तज्ञ, विखे फौंडेशन हॉस्पिटल), डॉ. तनु चौधरी, (विखे फौंडेशन हॉस्पिटल), डॉ. रुचा टिपरे  (विखे फौंडेशन हॉस्पिटल), डॉ. काजल जैन, (विखे फौंडेशन हॉस्पिटल), डॉ. अम्रता पायगुडे (विखे फौंडेशन हॉस्पिटल), स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर आणि वरिष्ठ सहसंचालक अनिल गावडे  आदी  मान्यवर  उपस्थित होते. डाँ. वांडेकर  पुढे म्हणाले  की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या कामाबरोबर आरोग्याकडे लक्ष देणेही  महत्वाचे आहे. 10 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या एच.पी.व्ही. तपासणी शिबिरामध्ये देह व्यापार्यातील बळी 180 महिला, स्नेहालयातील 140 निराधार बालिका आणि स्नेहाधार प्रकल्पातील 45 निराधार महिलांनी सह्भागीत होऊन आपली चाचणी करून घेतलेली होती. आज त्याचाच पहिला टप्पा म्हणून स्नेहालयातील निराधार बालिकांना एच.पी.व्ही. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आले. 25  डिसेंबर 2020 पर्यंत एच.पी.व्ही. तपासणी व चाचणी करणार्‍या सर्व महिलाआणि बालिकांना  एच.पी.व्ही. लस देण्यात येणार आहे.
    महिलांचे आरोग्य हा आजही भारतात दुर्लक्षित विषय आहे. त्यामुळे स्नेहालयाने आयोजित केलेले हे  एच.पी.व्ही. लसीकरण निराधार बालिकांसाठी आणि शोषित महिलांसाठी वरदानच ठरेल, असे डॉ. गणेश मिसाळ  यांनी आपल्या मनोगतात सांगितले. येथून पुढे देखील अश्या उपक्रमांना विखे पाटील फौंडेशन हॉस्पिटल  नेहमीच सहयोग करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शिबिराच्या समारोप प्रसंगी स्नेहालयाचे संजय गुगळे यांनी संवाद साधतांना वंचित घटकातील महिलांसाठी व्यसनमुक्तीचा नवीन प्रकल्प सुरु करण्यात येईल असे सांगितले. अश्या प्रकारच्या लसीकरण मोहिमेमध्ये तसेच या नवीन प्रकल्पात  जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत शेंबडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समाधान धालगुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू कांबळे, विजय गायकवाड, बेबी केंगार, स्वाती बोरगे, सुवर्ण रहाणे, सोनाली लीमजे, संदीप क्षीरसागर, नितीन मोरे, महेश आगरवाल, यशवंत कुरापट्टी, दीपक बुरम, राहुल देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment