साईदीप हॉस्पिटल मानसोपचार विभाग सर्वांगीण : डॉ भरत वाटवानी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

साईदीप हॉस्पिटल मानसोपचार विभाग सर्वांगीण : डॉ भरत वाटवानी

 साईदीप हॉस्पिटल मानसोपचार विभाग सर्वांगीण : डॉ भरत वाटवानी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः साईदीप हॉस्पिटल मधील मानसउपचार विभाग सर्वागीण असुन सर्व सुविधा व पेशंट ची योग्य देखभाल पाहुन कौतुक वाटले असे सांगून डॉ भरत वाटवानी यानी रोड वरील वाटसरू मानसिक रुग्ण यांच्या साठी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे त्याना आंमची संस्था श्रद्धा फाउंडेशन (कर्जत ठाणे) सहकार्य करेल अशी ग्वाही डॉ वाटवानी यानी दिली
     मानसउपचार क्षेत्रात योगदान दिल्या बद्दल डॉ भरत वाटवानी याना रोमन मेगसेसे पुरस्कार मिळाल्या बद्दल  व ते आज नगर मध्ये आल्यावर साईदीप हॉस्पिटल तर्फे त्यांचा सत्कार साईदीप चे संचालक डॉ कैलाश झालानी व डॉ आर आर धूत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बोलताना डॉ भरत वाटवानी यानी रसत्याच्या कड़ेला असलेले वाटसरू मानसिक रुग्ण यांच्या संगोपनासाठी आंमची संस्था श्रद्धा फाउंडेशन कार्य करते अश्या रुग्नणा समजून घेऊन त्यांच्या वर उपचार करून त्याना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले पाहिजे समाजातील प्रत्येक व्यक्तिने या साठी आपले योगदान दिले पाहिजे साईदीप हॉस्पिटल मधील सुसज्ज मनोरुग्ण विभाग त्यातील सर्व सेवा खूप चांगल्या दर्ज्याच्या आहेत म्हणून या समजसेवेत साईदीप ने सुद्धा सहकार्य केले पाहिजे अशी माझी इच्छा आहे असे सांगून डॉ भरत वाटवानी यानी देशात 1 हजार 800 लाख मनोरुग्न आहेत आपण सर्वानी प्रयत्न केल्यास निश्चित आपण अश्या मनोरुग्नना न्याय देउ शकु असे सांगितले या वेळी बोलताना डॉ आर आर धूत यानी डॉ भरत वाटवानी यांचे कार्य कसे व किती मोठे आहे या विषयावर माहिती दिली.

No comments:

Post a Comment