मातृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने अनेक महिलांना मातेचा दर्जा मिळवून दिला ः सौ. घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

मातृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने अनेक महिलांना मातेचा दर्जा मिळवून दिला ः सौ. घुले

 मातृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने अनेक महिलांना मातेचा दर्जा मिळवून दिला ः सौ. घुले


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः डॉ. ज्योत्स्ना डौले यांनी सुरू केलेल्या मातृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून वंध्यत्व निवारण ही सुविधा उपलब्ध करून नगर जिल्ह्यातील अनेक मातांना मातृत्व देऊ केले, त्यांचे हे आरोग्य कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केले
डौले हॉस्पिटल मध्ये मातृत्व टेस्ट बेबी सेंटर च्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर मोफत वंध्यत्व निवारण तपासणी शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराचे उद्घटन राजश्री घुले यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष किशोर मरकड, डॉ. स्वाती घुले, डॉ. अश्विनी शिंदे, डॉ. पांडुरंग डौले, डॉ. शाम तारडे,डॉ. स्मिता तारडे, डॉ. ईश्वर कणसे, डॉ. शरद पाचरणे, डॉ. पल्लवी सरडे ,डॉ. ज्योत्स्ना म्हस्के, डॉ. प्रशांत नगरकर, डॉ. नीलिमा डौले, जया रोहमारे,डॉ. निमिषा डौले, युवराज डौले,शाम डौले, अशोक पवार,अजय पासकंडी, दीपक काशीद, आदीसह रुग्ण उपस्थित होते .
     घुले म्हणाल्या की, डॉ.पी.एम.डौले व डॉ.ज्योत्स्ना डौले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊन तीस वर्षांपूर्वी नगर शहरात वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली.चांगली आरोग्य सेवा देत त्यांनी रुग्णांचा विश्वास संपादन केला त्यातूनच डॉक्टर ज्योत्स्ना डौले यांनी वंध्यत्व निवारण चे काम हाती घेऊन यात लागणारे आधुनिक उपकरणे व नवे तंत्रज्ञान आत्मसात करत मातृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू केले आज सोळा वर्ष हे सेंटर त्या चालवत आहेत त्या निमित्ताने व सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी मोफत उपचार शिबिराचा घेतलेला उपक्रम हा गौरवास्पद आहे.
यावेळी बोलताना मातृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना डौले म्हणाल्या की, सध्याची परिस्थिती ही करोनाग्रस्त आहे. सर्वजण या परिस्थितीतून जात आहे याची जाणीव आम्हाला आहे. यातूनच मातृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन केले असून यामध्ये रुग्णांची तपासणी व सोनोग्राफी मोफत करण्यात येणार आहे. तसेच यासाठी ज्या तपासण्या लागतील यामध्ये 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच ज्या रुग्णांना उपचार घ्यायचे आहेत त्यांना औषध बिलामध्ये व रुग्ण सेवेमध्ये सवलत देण्याचा आमचा विचार आहे . गेली तीस वर्ष स्त्रियांच्या आजारपणाची तपासणी करताना माझ्या असे लक्षात आले की सध्याच्या परिस्थितीत अनेक विवाहित जोडप्यामध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत याला कारण ताण-तणाव , नैसर्गिक बदल, प्रदुषण, खाण्यात झालेले बदल, शारीरिक समस्या यामुळे लवकर अपत्याचा जन्म होत नाही ,त्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रत्येक विवाहित स्त्रीला आई होण्याचा अधिकार आहे आणि तो मिळवून देण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न गेली सोळा वर्षापासून करत आहोत अनेक रुग्णांना यामध्ये यश आले आहे. गेली तीस वर्ष डॉक्टर डौले हॉस्पिटलच्या माध्यमातून अस्थीरोग आणि स्त्री रोग या विषयावर वैद्यकीय सेवा आम्ही देत आहोत.
     उपस्थितांचे स्वागत डॉ. गुरलींग राजमाने यांनी केले तर आभार व्यवस्थापक किरण गायकवाड यांनी मानले. सदर शिबिर हे सावेडी रोडवरील डॉक्टर डौले हॉस्पिटल येथे पंधरा ते तीस डिसेंबर रोजी होत असून दररोज सकाळी 11 ते 2 या वेळेत रुग्ण तपासणी मोफत करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना तपासणी साठी नाव नोंदवायचे आहे त्यांनी आपली नावे खालील पत्त्यावर नोंदवावीत. मातृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, डौले हॉस्पिटल, सावेडी रोड, अहमदनगर 0241-2426020, 8275202004.

No comments:

Post a Comment