आजपासून जिल्हा क्रीडा संकुल अटी, शर्तीवर व्यायामासाठी सुरू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

आजपासून जिल्हा क्रीडा संकुल अटी, शर्तीवर व्यायामासाठी सुरू.

 आजपासून जिल्हा क्रीडा संकुल अटी, शर्तीवर व्यायामासाठी सुरू.


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः आजपासून जिल्हा क्रीडा संकुल, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा हे प्रेक्षक वा सामुहिक जमावाला वगळुन फिरण्यासाठी व शारिरीक व्यायामासाठी पहाटे 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते रात्री 9 या कालावधीत सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करुन खुले ठेवण्यात येणार आहे.
संकुलात प्रवेश करण्यापूर्वी व संकुलातून बाहेर जातांना मास्कचा तसेच सॅनिटायझरचा वापर केलेला असावा. तसेच संकुल समितीने निश्चित केलेली प्रवेश फीची रक्कम भरुन व प्रवेश पास सोबत असेल तरच संकुलात प्रवेश दिला जाईल. सराव झाल्यानंतर गर्दी न करता वेळेत संकुल परिसरातून बाहेर पडावे. संकुलातील प्रवेश व वापराबाबतच्या अटी संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ व दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत. त्याचे अवलोकन होवून त्यानुसारच खेळाडू व नागरिकांनी शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
     कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोनमध्ये क्रीडा संकुल, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्यायामासाठी सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करुन खुले ठेवणेस परवानगी दिली असून प्रेक्षक वा सामुहिक जमावाला परवानगी दिलेली नाही. जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोनमध्ये क्रीडा संकुले, स्टेडियम आणि इतर सामुहिक जमावाला परवानगी असणार नाही. शारिरीक व्यायाम व इतर व्यवहार, कृतीसाठी सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेश देण्यात आलेले आहेत.

No comments:

Post a Comment