स्थानिक आघाड्यांही महत्वाच्या, ग्रामपंचायतीसाठी पॅनल.. मोर्चेबांधणी सुरू.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

स्थानिक आघाड्यांही महत्वाच्या, ग्रामपंचायतीसाठी पॅनल.. मोर्चेबांधणी सुरू..

 स्थानिक आघाड्यांही महत्वाच्या, ग्रामपंचायतीसाठी पॅनल.. मोर्चेबांधणी सुरू..

राज्यातील महाआघाडी पॅटर्न गल्लीतही.


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्ह्यातील सुमार 767 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला अनं गावागावात सोयीस्कर युतीच्या पॅनल जुळवाजुळवीसाठी चर्चांना उत आला असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. राज्यातील महाआघाडी पॅटर्न आता गल्लीत ही पहायला मिळत असून स्थानिक पातळीवर आघाड्यांनाही मोठे महत्व आहे.
    यंदा पंचवार्षीक निवडणूकीत आद्याप सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली नाही तरी देखील गावात गटातटाच्या राजकारणाला सुरूवात झाली आसून गावात सुरूवातीपासून गावागावात यांचा प्रबळ गट असून त्याबरोबर भाजपचा देखील मोठा गट आहे. शिवाय खासदार सुजय विखे पाटील यांचा गट अनेक तालुक्यात सक्रिय आहे. त्यामुळे सर्वच गटनेत्यांनी स्वतंत्र आपल्या गटाचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व कसे होईल याकडे गेल्या वर्षभरापासून लक्ष केंद्रीत केले आहे. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत अवलंबुन असलेल्या नेत्यांना आता पॅनलसाठी जुळवाजुळव करावी लागत आहे. शिवाय राजकारणात राज्यातील महाविकास आघाडी विरोध भाजपा असा पॅटर्न राहिल्यास दुरंगी लढत होईल न पेक्षा प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र पॅनेल उभारल्यास लढत चैारंगी होण्याची शक्यता दिसत आहे. गावातील मागील 5 वर्षात विकासकोणी केला यावरच या निवडणुकांचे निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे विकासाचा जाहिरनामा फक्त अश्वासनावरच गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणूकीत विकासकामे करणार्‍यांनाच प्राधान्य देण्याचे नागरिकातून बोलले जात आहे. पण या सर्वांत ज्या अपक्ष उमेदवारांनी गत निवडणूकीतून अर्ज माघारी घेतले त्यांना दिलेल्या आश्वासनांच काय म्हणून यंदाच्या निवडणूकीत आपक्षांना शब्द देवून थांबवणे हे गावपुढा-यांना दमछाक होणारे ठरणार आहे.
    सरपंच पदासाठी कोणते आरक्षण येईल याकडे गटनेते लक्ष ठेवून बसले आहेत. ज्या गटाकडे सर्व समाजातील उमेदवार उपलब्ध आहेत त्यांचाच यामध्ये टिकाव लागणार असून फक्त जनरल उमेदवार असणार्‍या गटाची मात्र तारेवरली कसरत सुरू आहे. काही गटनेत्यांनी एकत्र लढण्याविषयी एकमेकांना आपला प्रस्ताव कळवला असला तरी अद्याप कोणत्याही गटाशी एकमेकांशी अधिकृत युती जाहिर झालेली नाही त्यामुळे निवडणूक कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment