भिंगार भाजपच्यावतीने कापडी पिशव्यांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

भिंगार भाजपच्यावतीने कापडी पिशव्यांचे वाटप

 स्वच्छता जनजागृतीचा उपक्रम अनुकरणीय  : गंधे

भिंगार भाजपच्यावतीने कापडी पिशव्यांचे वाटप

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः करोना महामारी मुळे आपल्याला स्वच्छतेचे महत्व समजले आहे. रोग- राईला लांब ठेवण्यासाठी सर्वत्र स्वच्छता असणे गरजेचे झाले आहे. प्रत्तेकाने आपल्या घर पासून स्वच्छतेस सुरवात केल्यास आपले शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेवून स्वच्छता अभियान सुरु केले आहे. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होत आपल्या घरापासून स्वच्छतेस सुरवात करावी. भाजपच्या भिंगार मंडलाच्या वतीने स्वच्छ व प्लॅस्टिक मुक्त भिंगार होण्यासाठी सुरु केलेले जनजागृती अभियानाचे इतरांनी अनुकरण करावे, असे प्रतिपादन शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.
    भिंगार छावणी परिषदेच्या वतीने 15 डिसेंबर पर्यंत भिंगार शहरात स्वच्छता पंधरवडाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या भिंगार मंडलाच्या वतीने अध्यक्ष वसंत राठोड यांच्या संकल्पनेतून प्लॅस्टिक मुक्त भिंगार होण्यासाठी नागरिकांना कापडी पिशाव्याचे वाटप शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले छावणी परिषदेचे स्वच्छता निरिक्षक रमेश साके व गणेश भोर यांनी उपस्थित सर्वांना भिंगार शहर स्वच्छ व प्लॅस्टिक मुक्त ठेवण्याची सामुहिक शपथ दिली. यावेळी भिंगार छावणी परिषदेच्या सदस्य शुभांगी साठे, भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष शिवाजी दहींडे, गणेश साठे, महिला आघाडी अध्यक्षा ज्योत्सना मुंगी, भिंगार युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, शहर युवा अध्यक्ष महेश तवले, ब्रिजेश लाड आदींसह नागरिक उपस्थित होते.
   प्रास्ताविकात वसंत राठोड म्हणाले, भिंगार मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कायम लोकाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत. नुकतेच छावणी परिषदेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानच्या समाप्ती निमित्त भिंगार भाजपच्या वतीने नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून भिंगार शहर प्लॅस्टिक मुक्त होण्यासाठी जनजागृती केली आहे. त्यास नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
    यावेळी भाजपच्या वतीने जनजागृतीचे स्टीकर दुकानांमध्ये व घरांना लावण्यात आले. किशोर कटोरे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. त्रीझा रॉक, सौरभ रसाने, संतोष हजारे, शुभम गवळी, सुमित राठोड, मनोज ननवरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here