संत किसनगिरीनगर येथे दत्त जयंती उत्साहात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

संत किसनगिरीनगर येथे दत्त जयंती उत्साहात

 संत किसनगिरीनगर येथे दत्त जयंती उत्साहात


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सावेडी भिस्तबाग रोड येथील गुरुदत्त भक्तिधाम येथे भगवान दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अल्प संख्येने आरोग्याचे नियम पाळून साजरा केला.दत्त जयंतीनिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे श्री दत्तात्रय मंदिरामध्ये स्थानिक सेवेकरींच्या उपस्थितीत पार पडला.श्री दत्तात्रय भगवान व श्री समर्थ किसनगिरी बाबांच्या व प्रातःसमरणीय प.पु.गुरुवर्य भास्करगिरी   महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या आशीर्वादाने  व प्रेरणेने साकारलेल्या संत किसनगिरीनगर येथील भक्तिधाम मंदिरात कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होते.दत्त जयंतीनिमित्त  मंदिरात अभिषेक पहाटे सकाळी 5ते 8 या वेळेत करण्यात आला.नित्य पूजा व महाआरती करण्यात आली. सकाळी 9ते 12 अभन्गावली ग्रंथाचे पारायण करण्यात आले.दर पौर्णिमेची महाआरती 12वाजता हरिपाठ दु.3.30ते 4.30 वाजता श्री दत्त अवतार महिमा व अभन्ग वाचन व प्रवचन व नंतर दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.कोरोनामुळे महाप्रसाद रद्द करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी समर्थ सदगुरु किसनगिरी बाबां भक्त मंडळ उपस्थित होते. गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात आकर्षक विदुत रोषणाई करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment