रविवारी महिलांसाठी मोफत मुळव्याध, हिमोग्लोबिन, शुगर तपासणी शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

रविवारी महिलांसाठी मोफत मुळव्याध, हिमोग्लोबिन, शुगर तपासणी शिबीर

 रविवारी महिलांसाठी मोफत मुळव्याध, हिमोग्लोबिन, शुगर तपासणी शिबीर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः चेडे अ‍ॅक्सिडंट अ‍ॅण्ड सर्जिकल हॉस्पिटलच्यावतीने व मखदुम सोसायटीच्या सहकार्याने रविवार दि. 3 जानेवारी 2021 सवित्रीबाई फुले जयंती दिन महिला शिक्षक दिनानिमित्त महिलांसाठी मोफत मुळव्याध, हिमोग्लोबिन व शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुळव्याध सर्जन डॉ.रेश्मा चेडे यांनी दिली.
     रविवार दि. 3 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत चेडे हॉस्पिटल, विराज इस्टेट, तारकपुर बसस्टॅण्ड समोर, अहमदनगर होणार्या या शिबीरासाठी नावनोंदणी आवश्यक असून, त्यासाठी फोन : 0241-2428628, 2411498 व 8888659568 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन डॉ.संतोष चेडे यांनी केले आहे.
महिलांची मूळव्याधची तपासणी ही महिला डॉक्टर करतील. तरी या संधीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बी.डी. सुरकुटला व आबीद दुलेखान यांनी केले.

No comments:

Post a Comment