योग विद्या धामचे योगासने व प्राणायाम बेसिक वर्ग प्रवेश सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

योग विद्या धामचे योगासने व प्राणायाम बेसिक वर्ग प्रवेश सुरू

 योग विद्या धामचे योगासने व प्राणायाम बेसिक वर्ग प्रवेश सुरू

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः लॉकडाऊनच्या प्रदिर्घ कालावधीनंतर योग विद्या धाम च्यावतीने योगासने व प्राणायामचे वर्ग अहमदनगर शहरात विविध ठिकाणी सुरू होत असल्याची माहिती अध्यक्ष डॉ सुंदर गोरे यांनी दिली.
सध्याच्या कोरोना साथीच्या आजाराच्या काळात प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढविण्यास तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास अत्यंत उपयुक्त असणारे योगासने व प्राणायाम नियमित वर्ग सुरु झाले आहेत. योग प्रवेश प्रक्रिया  रावसाहेब पटवर्धन स्मारक, कुष्ठधाम रोडवरील योग भवन, सिध्दीबाग येथील योग भवन आणि गुलमोहर रोडवरील नवले हॉल येथे  सकाळी व संध्याकाळी होणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या वर्गाला यावे असे आवाहन  योग विद्या धामचे  कार्याध्यक्ष जयंत वेसीकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0241- 2421255,  2325594 किंवा 9423676059 या नंबरवर संपंर्क साधावा.

No comments:

Post a Comment