९१ हजाराच्या मुद्देमालासह अट्टल गुन्हेगार जेरबंद.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 18, 2020

९१ हजाराच्या मुद्देमालासह अट्टल गुन्हेगार जेरबंद..

 ९१ हजाराच्या मुद्देमालासह अट्टल गुन्हेगार जेरबंद..

श्रीगोंदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई


श्रीगोंदा  -
श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील देविदास भानुदास ठोंबरे यांच्या मालकीच्या सुनिता किराणा दुकानातुन दि.१० डिसेंबर रोजी रात्री चोरी होऊन दुकानातील किराणा माल तसेच गावातील अमोल संभाजी धावडे यांची होंडा युनिकॉर्न ही दुचाकी असा एकुन 1 लाख 46 हजार 682 रु किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत झालेली घरफोडी ही वांगदरी येथील चिंगळ्या टवक्या काळे याने केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकास सुचना करत दि. 16 डिसेंबर रोजी तपास पथकाने चिंगळ्या टवक्या काळे 40 वर्षे रा.टुलेवस्ती वांगदरी ता श्रीगोंदा याला टुलेवस्ती, वांगदरी ता.श्रीगोंदा येथुन त्याचे राहत्या घरातुन सापळा रचुन ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल करत गुन्ह्यातील चोरी केलेला मालापैकी एक खाद्य तेलाचा भरलेला डबा व एक मोकळा डबा तसेच एक होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची एम.एच 16 बी.क्यु 8534 असा एकूण 91 हजार 700 रु किंमतीचा माल जप्त केला. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.दिलीप तेजनकर, पो.हे. कॉ. अंकुश ढवळे , पो.कॉ प्रकाश मांडगे , पो.कॉ संजय काळे , पो.कॉ गोकुळ इंगावले , पो.कॉ किरण बोराडे , पो.कॉ दादा टाके , पो.कॉ विनायक जाधव यांनी केली आहे. घटनेचा अधिक तपास स. फौ.गावडे व पो.कॉ सचिन म्हस्के हे करित आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here