वाडियापार्क सह सर्व मैदाने उद्यापासून खुली. संभाजी कदमांच्या प्रयत्नास यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

वाडियापार्क सह सर्व मैदाने उद्यापासून खुली. संभाजी कदमांच्या प्रयत्नास यश

 वाडियापार्क सह सर्व मैदाने उद्यापासून खुली. संभाजी कदमांच्या प्रयत्नास यश

प्रेक्षक व सामूहिक जमावाला परवानगी नाही..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कॅन्टोन्मेंट झोन वगळता नॉन रेड झोनमध्ये क्रीडा संकुले, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्यायामासाठी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून खुले करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी जारी केला आहे. पण प्रेक्षक व सामुहिक जमावाला परवानगी नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
तशा प्रकारचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिला असल्याची माहिती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली. शहरातील वाडियापार्क सह सर्व मैदाने खुली करण्याची मागणी श्री. कदम यांनी केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, उद्यापासून सर्व मैदाने खुली होणार आहेत.
गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून नगर शहरातील सर्व मैदाने बंद होती. परिणामी नागरिकांना नियमित व्यायाम करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती खेळाडूंची ही मोठी गैरसोय झाली होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेण्यात आली. क्रीडासंकुलात वैयक्तिक व्यायामासाठी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली. तथापि प्रेक्षक व सामुहिक जमावाला परवानगी नसणार आहे.

No comments:

Post a Comment