छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार स्मायलिंग अस्मिता करणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार स्मायलिंग अस्मिता करणार.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार स्मायलिंग अस्मिता करणार.

छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या १३७ व्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थितांचा निर्धार!


नगर-
छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकात स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या १३७ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी डॉ अनिल आठरे, अहमदनगर महानगर पालिकेचे नगरसेवक डॉ सागर बोरूडे, बाळासाहेब पवार, भैरवनाथ वाकळे, गणेश शेंडगे शहर अभियंता सुरेश इथापे, श्री निंबाळकर,चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजित वाघ, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ खान दुले खान, उद्योजक मुन्नाशेठ चमडेवाले, डॉ पारस कोठारी, हरिष भांबरे आणि शहरातील इतर मान्यवर सहभागी झाले होते.प्रास्तिविकात स्मायलिंग अस्मिताचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी सांगितले की छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकाचे नुतनीकरण करण्यासाठी २०१२ साली लढा उभारला आणि आता पर्यंत स्मारकाचे मोठ्याप्रमाणात आधुनिकीकरण करण्यात आले आहे.आता माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी शहरातील मान्यवर मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे,हे मंदिर ज्या शैक्षणिक संस्थेत आहे त्या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बंद करून तेथे दुसरेच मंदिर स्थापन केले आहे.पाच वर्षांचं नवीन मंदिर चकचकीत आहे पण १३७ वर्षे जूना ऐतिहासिक वारसा जपायची नैतिकता मात्र त्यांच्याकडे नाही.सदरील मंदिराचा कळस पडण्याची चिन्हे दिसत आहेत तरी देखील आपण अहमदनगरकरांनी हे जपण्यासाठी पुढं आलं पाहिजे असे आवाहन करताच डॉ अनिल आठरे यांनी याबाबत मोठी मदत करू सदरील इतिहास पुढे आणण्यासाठी सर्वोतोपरी सक्षमपणे सोबत राहू असा शब्द दिला.नगरसेवक सागर बोरूडे आणि बाळासाहेब पवार यांनी सुध्दा स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चौथे शिवाजी महाराज स्मारक संपूर्ण महाराष्ट्रात माहिती करून देत छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा संघर्षशिल इतिहास जगापुढे आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही सुध्दा नेहमीच या चळवळीत सहभागी होत असतो याचा अभिमान आहे असे प्रतिपादन केले. दरम्यान शहर अभियंता सुरेश इथापे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी कायदेशीर बाबी लक्षात घेऊन तेथील अतिक्रमण निर्मूलन योग्य प्रकारे करून सदरील मंदिर शासनाच्या क वर्ग गटात सामाविष्ट करण्यासाठी कागदोपत्री मदत केली जाईल असे आश्वासन उपस्थितांना दिले.भैरवनाथ वाकळे यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा इतिहास उपस्थितांना सांगितला.गणेश शेंडगे यांनी सांगितले की छत्रपती घराण्याचा इतिहास हा संघर्षाचा आणि प्रेरणेचा आहे. आपल्या मायभूमीसाठी त्यांनी रक्त सांडले आहे. अहमदनगरांनी पुढे येऊन हा शिवसन्मान जपला पाहिजे. इतरांची वाट न पाहता सार्वजनिक मदत उभी करुन छत्रपती शिवाजी मंदिरांचा जीर्णोद्धार केला पाहिजे.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या समाधीला पुष्पहार व चक्र अर्पण करून झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सापते यांनी केले तर आभार प्रदर्शन मयूर ढगे यांनी केले. कार्यक्रमासाठी पक्षी तज्ञ अजिंक्य सुपेकर, अभिजीत काचोळे, भाऊसाहेब मरकड, कपिल पवार ,विशाल म्हस्के, डॉ गौरव नरवडे,अतुल चौधरी,अक्षय शेळके यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment