स्वप्निल कुर्‍हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 18, 2020

स्वप्निल कुर्‍हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान

 स्वप्निल कुर्‍हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात मृत पावलेल्या कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी माणुसकीच्या भावनेने कार्य केल्याबद्दल फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने अमरधाम येथील सेवक स्वप्निल कुर्हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरदेवळे (ता. नगर) येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते कुर्हे यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, बापूसाहेब शिंदे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, सावली संस्थेचे नितेश बनसोडे, अय्युब पठाण, मयुर पाखरे, गौरव बोरुडे, अमोल धाडगे, राजू ताजणे, मयुर पाखरे, सौरभ बोरुडे, सुरेश नन्नवरे आदि उपस्थित होते.  
कोरोनाच्या महामारीत  स्वप्निल कुर्हे यांनी कोरोना रुग्णांचे अंत्यविधी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here