द व्हिजन स्पा (ऑप्टीकल) व एबीसीडी कलेक्शनचे शानदार उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

द व्हिजन स्पा (ऑप्टीकल) व एबीसीडी कलेक्शनचे शानदार उद्घाटन

 द व्हिजन स्पा (ऑप्टीकल) व एबीसीडी कलेक्शनचे शानदार उद्घाटन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सिंधी कॉलनी येथील झुलेलाल मंदिर समितीचे सदस्य तसेच सिंधी युवा शक्ती ग्रुपचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जयकुमार रंगलानी यांच्या परिवाराने मिस्कीन रोडवरील सिटी सेंटर येथे नव्याने सुरु केलेल्या ‘द व्हिजन स्पा (ऑप्टीकल) व एबीसीडी कलेक्शनचे उद्घाटन आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, सुमतीलाल कोठारी,  संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज हरिश खुबचंदानी, जयकुमार खुबचंदानी, महेश मध्यान, सुरेश हिरानंदानी, तिलोकचंद रंगलानी, हरिश रंगलानी, किशोर रंगलानी, राणा किरतानी, चिंटू गंभीर, जनक आहुजा, विठ्ठल लांडगे, कुमार मास्तर गाबरा, नानकराम मटलाई तसेच सिंधी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ.अरुण जगताप म्हणाले, कोणत्याही व्यवसाय हा प्रामाणिकपणा, सचोटीवर चालत असतो. ग्राहकाभिमुख सेवा दिल्यास व्यवसायाची भरभराट होत असते. आजच्या फॅशनच्या युगात ग्राहकांना काय पाहिजे, ते ओळखून ते दिले पाहिजे. रंगलानी परिवाराने पूर्वीपासून आपल्या व्यवसायाद्वारे लोकाभिमुख सेवा दिली आहे. आता या भव्य दालनातील सेवेतून ग्राहकांचा विश्वास संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला.
द व्हिजन स्पा (ऑप्टीकल)चे संचालक कुणाल रंगलानी यांनी सांगितले की, या शॉपमध्ये ब्रॅडेड कंपन्यांचे सनगॉगल्स्, नंबरचे चष्मे, अनेक प्रकारच्या आकर्षक फ्रेम्स वाजवी दरात उपलब्ध आहेत. डोळ्यांची तपासणी करुन अचून नंबर देण्याची सोय करण्यात आलेली आहे. ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देण्यावर आमचा भर राहील, असे सांगितले.
एबीसीडी कलेक्शनच्या संचालिका विनिता रंगलानी म्हणाल्या की, लेडीज शॉपीची सुरुवात साधू वासवानी सोसायटील घरापासून करण्यात आली. सदैव नवनवीन फॅशनचे, डिझाइन्स्चे पॅटर्न, आकर्षक रंगसंगती, वाजवी दरात उपलब्ध करुन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आज या भव्य दालनात महिला व युवतींना अधिक चांगली सेवा देण्यासाठी सज्ज झालो आहोत. या दालनात लखनवी सुटची एक्झल्युझिव्ह कलेक्शन, वेडिंग कलेक्शन, पार्टी वेअर, चिकन कलेक्शन तसेच लेटेस्ट फॅशनचे ड्रेसेस, कुर्तीज्, लेगिंग्स आदिंची विस्तृत व्हरायटीज़् वाजवी दरात उपलब्ध असल्याचे सांगून महिला व युवतींनी शॉपीला भेट देऊन अनुभव घेण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्घाटनानंतर अनेक मान्यवर, हितचिंतक, मित्र परिवार यांनी दालनास भेट देऊन रंगलानी परिवारास शुभेच्छा दिल्या. जयकुमार रंगलानी यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here