ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

 ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्यावतीने तसेच महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रोहिणी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप्रज्वलन करुन शिबीरास सुरवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक सदाशिव रणदिवे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेश पवार,  अशोक झोटींग,प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश बोरुडे, महावीर कांकरिया, रवी किथानी आदीसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने तसेच सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती रोहिणी पवार यांनी दिली.
पुढे त्या म्हणाल्या की, शस्त्रक्रियेच्यावेळी पेशंटना रक्ताची गरज भासते. आयत्या वेळी त्याच रक्तगटाची व्यक्ती उपलब्ध होणे कठीण असते. रक्तपेढ्यांचा पर्याय असला तरी तो शहरांपुरता मर्यादित असतो. ग्रामीण भागात जिथे हॉस्पिटल्स किंवा साध्या दवाखान्यांचीही वानवा आहे, तिथे रक्तपेढ्या कोठून असणार? तसेच, रक्त मिळाले तरी या संक्रमणातून आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा वेळी आपलेच रक्त आपल्या मदतीला येऊ शकते.

No comments:

Post a Comment