विद्यार्थी बस वाहतुक करणार्‍यांना सरकारने दिलासा देण्याचे काम करावे- विक्रम राठोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

विद्यार्थी बस वाहतुक करणार्‍यांना सरकारने दिलासा देण्याचे काम करावे- विक्रम राठोड

 विद्यार्थी बस वाहतुक करणार्‍यांना सरकारने दिलासा देण्याचे काम करावे- विक्रम राठोड

अ.भा.विद्यार्थी महासंघास जिल्हा विद्यार्थी वाहतूक सेनेचा पाठिंबा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाच्यावतीने राज्य शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्यांना नगर जिल्हा  विद्यार्थी वाहतूक सेनेच्यावतीने पाठिंबा देऊन विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, शहर वाहतुक सेनेचे शहर प्रमुख संजय आव्हाड, अशोक शेळके, रफिक शेख, राजू गहिले आदि उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे गेल्या एक वर्षांपासून वाहने जागेवर उभे असल्याने वाहनांसाठी एक वर्षासाठी कर माफी मिळावी. स्कूल बससाठी सहानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच कर्जावरील हप्ते व व्याज माफ व्हावे. स्थनिक क्षेत्रात लोक वाहतुकीस परवानगी देण्यात यावी. वाहनांना विमा सवलत मिळावी, तसेच जाचक स्कूलबस नियमावली 2011 हा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
यावेळी विक्रम राठोड म्हणाले, गेल्या 8-9 महिन्यांपासून शाळा बंद असल्याने स्कूल बस वाहतुक करणार्‍यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. अजूनही शाळा सुरु झाल्या नसल्याने या वाहन चालकांना दिलासा देण्याचे काम सरकारने करावे. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या योग्य असून, त्या मागण्यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संजय आव्हाड म्हणाले, कोरोनामुळे बस वाहतुक बंद असल्याने यावर उपजिविकी असणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय जरी बंद असले तरी बँकेचे हप्ते, विमा, पासिंग, आरटीओ वार्षिक कर हे सुरु आहेत. व्यवसाय बंद असल्याने हे कर भरणे शक्य नाही. त्यामुळे किमान यामध्ये सवलत देऊन, या व्यवसायावर अलवंबून असणार्‍यांना अनुदान देऊन दिलासा देण्याचे काम करावे, असे म्हटले आहे. सदरील मागण्यांचे निवेदन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनाही देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here