पूर्णवेळ विद्युत अभियंता व विद्युत साहित्य मिळावे या मागणीसाठी स्थायी समिती सभापतींचे उपोषण सुरू... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

पूर्णवेळ विद्युत अभियंता व विद्युत साहित्य मिळावे या मागणीसाठी स्थायी समिती सभापतींचे उपोषण सुरू...

 पूर्णवेळ विद्युत अभियंता व विद्युत साहित्य मिळावे या मागणीसाठी स्थायी समिती सभापतींचे उपोषण सुरू...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला पूर्णवेळ अभियंता मिळावा व विद्युत साहित्य उपलब्ध व्हावा इ. मागणीसाठी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण सुरू केले आहे या उपोषणात भाजपा शिवसेना काँग्रेस नगरसेवकांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
शहरामध्ये गेल्या आठ ते दहा महिन्यापासून विद्युत साहित्य मिळत नसल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नगर शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे लोकवस्ती वाढत आहे. त्या भागात लाईटचे दिवे बसविणे नगरसेवकाचे कर्तव्य आहे. मनपाच्या पोलवरील पथदिवे बंद आहेत. नागरिक वारंवार नगरसेवकांना लाईट बसविणेची मागणी करित आहेत. नागरिकांना कुठपर्यत उडवा उडवीची उत्तरे दयायची मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या रोषाला  नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचा फायदा घेवून चो-यांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार प्रशासनाला सांगूनही विद्युत साहित्य मिळत नाही. स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याची निविदा प्राप्त झाली आहे. परंतु विद्युत विभागाला पूर्णवेळ अभियंता नसल्यामुळे निविदा उघडण्यास विलंब होत आहे. प्रशासनावर मा.आयुक्त यांचा धाक नसल्यामुळे कोणीही विद्युत विभागाचा पदभार घेत नाही. जो पर्यत विद्युत विभाग प्रमुख व विद्युत साहित्य मिळणार नाही तो पर्यत आयुक्त यांचे दालनासमोर उपोषण सुरूच ठेवणार अशी माहिती स्थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सांगितले. यावेळी मा.श्री.संजय ढोणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment