कापड बाजारातील मस्जिदचा महापालिकेचा कर माफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

कापड बाजारातील मस्जिदचा महापालिकेचा कर माफ

 कापड बाजारातील मस्जिदचा महापालिकेचा कर माफ

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नातून


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कापड बाजार येथील बोहरी समाजाची मस्ज़िद आहे. या मस्ज़िदला महानगरपालिकेने वाणिज्य दराप्रमाणे  आकारलेला कर व त्यावर लावलेली शास्तीबाबत बोहरी मस्ज़िदच्या  पदाधिकार्यांनी  नगरसेवक बाळासाहेब  बोराटे यांना याबाबत माहिती दिली. नगरसेवक बाळासाहेब  बोराटे यांनी यात लक्ष घालून संबंधितांकडून माहिती घेऊन नियमाप्रमाणे जादा आलेला कर माफ करुन दिला.
याबाबतचे पत्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी बोहरी समाजाचे धर्मगुरु शेख औनअली डुंगरपुरवाला यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी परेश लोखंडे, जमातचे सेक्रेटरी शेख अब्बासभाई, कमिटी मेंबर शेख हुसेनभाई,  जोहेरभाई, शब्बीरभाई, सैफीभाई व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, कापड बाजार येथील बोहरी समाजाच्या मस्ज़िद मध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम होतात. त्यांचा व्यवसायिक वापर नसल्याने मनपाने चुकीच्या पद्धतीने संकलित कर आकारण्यात आला होता.  वास्तविक पाहता मनपा अधिनियमन 132(1) (ब) प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही. याबाबत आम्ही मनपाकडे कायदेशिररित्या सातत्याने पाठपुरावा करुन चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला कर मागे घेण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे नगरमधील कोणतेही धार्मिकस्थळ जसे मंदिर, मस्ज़िद, गुरुद्वारा, चर्च आदिंचा वापर जर व्यवसायिक होत नसले तर त्यांचाही  कर कमी करण्यासाठी आमच्याशी किंवा मनपाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी शेख अब्बासभाई  म्हणाले, शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक स्थळांचा जर वापर व्यवसायिक होत नसले तर त्यांना त्याप्रमाणे कर आकारले जातात. परंतु या मस्ज़िद ट्रस्टला व्यावसायिक दराने मनपाने कर व शास्ती आकारली होती. याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत सांगितले, त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करुन हा जादा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यापुढील काळात मस्ज़िद नियमाप्रमाणे नियमित कर भरले, असे सांगून याकामी मदत केल्याबद्दल श्री.बोराटे व मंगलताई लोखंडे यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment