‘नगररचनाकार’ हि मनपातील नेमणूक बेकायदेशीर ! नगररचना विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

‘नगररचनाकार’ हि मनपातील नेमणूक बेकायदेशीर ! नगररचना विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा.

 ‘नगररचनाकार’ हि मनपातील नेमणूक बेकायदेशीर ! नगररचना विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा.

काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांची राज्य मंत्र्यांकडे मागणी..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘नगररचनाकार’ हे पद महानगरपालिकेत अस्तित्वात नसताना या पदावर करण्यात आलेली नेमणूक बेकायदेशीर असल्याचे निवेदन नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना आमदार संग्राम जगताप, विनीत पाऊलबुद्धे माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुनील त्रंबके यांनी दिले आहे.
राज्यमंत्री तनपुरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर महानगरपालिकेचे नगररचनाकार हे गेल्या दीड वर्षापासून सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहेत. नगररचनाकार हे पदच मनपा मध्ये नसताना त्यांची नेमणूक बेकायदेशीर आहे. ते येथे आल्यापासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. परवानग्या व लेआउट मंजूर करताना सर्व नियम पायदळी तुडवून आर्थिक तडजोडीतून परवानग्या दिलेल्या आहेत. लेआउट मंजूर करताना नैसर्गिक ओढे-नाले गायब केलेले आहेत. याबाबत नगर महानगरपालिका, नगररचना विभागाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी. मोठ्या बिल्डरशी हात मिळवणी करून एक जमिनीचे अनेक तुकडे करून नियमातून पळवाट काढून अमेनिटी स्पेस न ठेवून मनपाचे नुकसान केलेले आहे. स्वतःच्या विभागात अभियंते असतानाही तांत्रिक कामे त्यांच्याकडे न सोपविता कनिष्ठ लिपिक, शिपाई यांच्याकडे कामे देऊन तडजोडी केल्या जात आहेत.
सीना नदीची पुर नियंत्रण रेषा निश्चित होऊन लेआउट परवानग्या दिल्या जात आहेत. याचा शहरावर गंभीर परिणाम होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

No comments:

Post a Comment