‘वंचित’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 18, 2020

‘वंचित’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

 ‘वंचित’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अद्यादेश त्वरित काढावा व विधान सभेच्या हिवाळी अधिवेशनात शेती मालाला हमीभाव मिळण्यासाठी तरतूद करावी यासह शेतकर्‍यांच्या इतर मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. ड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार झालेल्या या आंदोलनात पक्षाचे प्रवक्ते तथा प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सह समन्वयक ड. डॉ. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, महासचिव योगेश साठे, जेष्ठ सल्लागार जीवन पारधे, उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत नेटके, नंदकुमार गाडे, दत्तात्रय अंदुरे, ज्ञानदेव उच्छे, चंद्रकांत डोलारे, संतोष गलांडे, योगेश सदाफुले, बन्नू भाई शेख, सुनील बाळू शिंदे, फिरोज पठाण, भीमराव चव्हाण, सुरेश खंडागळे, वसंत नितनवरे, प्यारेलाल शेख, रवींद्र म्हस्के, अतिष पारवे, सोमनाथ भैलुमे, महेंद्र थोरात तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे स्वप्निल मोकळ, प्रकाश भालेराव, भूषण चव्हाण, संतोष कांबळे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, युवक अध्यक्ष बाळासाहेब केदारे यांनी जाहीर पाठिंबा दिला.
आपल्या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले.
धरणे आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रतिक बारसे, अरविंद सोनटक्के, संतोष गलांडे, स्वप्निल मोकळ यांची भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here